फलोत्पादन अभियानांतर्गत ५४६ प्रस्ताव मंजूर
By Admin | Updated: September 8, 2015 22:32 IST2015-09-08T22:32:29+5:302015-09-08T22:32:29+5:30
कृषी अधीक्षक कार्यालय : अद्याप १९९ प्रस्ताव प्रलंबित

फलोत्पादन अभियानांतर्गत ५४६ प्रस्ताव मंजूर
रत्नागिरी : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे विविध यांत्रिक अवजारांबरोबर शेततळे, हरितगृहे, पॅक हाऊस, तसेच प्रक्रिया उद्योग यांसारख्या विविध ५४६ प्रस्तावांना आॅगस्टअखेर मंजुरी देण्यात आली आहे, तर १९९ प्रस्ताव प्रलंबित आहेत.
शेतीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे शिवाय मजुरी वाढली असल्याने यंत्राचा वापर वाढला आहे. शिवाय बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे खर्च वाढत आहे. त्याचबरोबर शेतकरी विविध पिकांसाठी संशोधन करत आहेत.
शासनाकडून यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५४६ विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. क्षेत्रविस्तार केळी लागवडीचे ७, फुले लागवडीचे २, पुनरूज्जीवन २, सामूहिक शेततळे ८, नियंत्रित शेती हरितगृह ३, मल्चींग ३, शेडनेट १, पिक संरक्षक उपकरणांमध्ये ग्रासकटर, स्पे्रअर पंपाचे १६२, फलोत्पादन यांत्रिकी ८ बीएचपी कमीचे ३८, तर जास्तचे ३७, २० बीएचपीच्या २४४ ट्रॅक्टर १ प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. काढणीपश्चात व्यवस्थापनांतर्गत पॅक हाऊसचे १९, प्रक्रिया उद्योग ५, वातानुकूलीत वाहन १ व अन्य ७ मिळून एकूण ५४६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मंडणगड तालुक्यात १५, दापोली ४७, खेड ४२, चिपळूण १४, गुहागर २१, संगमेश्वर २२, रत्नागिरी १५५, लांजा ८८, राजापूर तालुक्यातील १४२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
आॅगस्टअखेर १९९ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. त्यामध्ये क्षेत्रविस्तार केळी लागवडीचे २, फुले लागवड १, पुनरूज्जीवन १६, सामूहिक शेततळे २, शेडनेट २, पीक संरक्षण उपकरणे ३८, फलोत्पादन यांत्रिकीकरण ८ बीएचपी कमीचे २, जास्तचे १० व २० बीएचपीचे ९०, ट्रॅक्टर ३ प्रस्ताव प्रलंबित आहेत. काढणीपश्चात व्यवस्थापनांतर्गत एकात्मिक शीतसाखळीचे १ व अन्य ३२ मिळून १९९ प्रस्ताव प्रलंबित असून, लवकरच त्यांना मंजूरी देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
मंडणगड तालुक्यात ८, दापोली २२, खेड १०, चिपळूण ५, गुहागर ८, संगमेश्वर २०, रत्नागिरी १०१, लांजा २३, राजापूर तालुक्यातील २ मिळून १९९ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)