मिरजोळे येथे काळ्या गुळाच्या ५२० ढेप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST2021-09-23T04:36:27+5:302021-09-23T04:36:27+5:30
रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन विभागाला १५ रोजी रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील मे. बी.के.पवार अँड सन्स येथे प्रतिबंधित ...

मिरजोळे येथे काळ्या गुळाच्या ५२० ढेप जप्त
रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन विभागाला १५ रोजी रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील मे. बी.के.पवार अँड सन्स येथे प्रतिबंधित पदार्थ-गुटखा पानमसाला आदींची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने अन्न सुरक्षा अधिकारी पाचपुते, वाबंळे, गुंजाळ यांनी याठिकाणी भेट देवून तपासणी केली. या तपासणीमध्ये ५२० ढेप काळा गुळ (अंदाजे वजन १०,४०० किलो) आढळला. त्याबाबत दुकान मालक प्रविण पवार यांच्याकडे विचारणी केली असता हा काळा गुळ पशुखाद्य म्हणून वापरत असल्याचे सांगितले. याबाबत कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने काळा गुळ हा हातभट्टी दारु तयार करण्यासाठी वापरला जात असल्याच्या संशयावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी कायद्यातंर्गत तरतुदीनुसार नमुने घेणे-काळा गुळ जप्त करणे अशी कारवाई केल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन (म. राज्य) रत्नागिरी यांनी कळविले आहे.