रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठाची बोगस पदवी धारण केलेल्या ४७ पदवीधर शिक्षक, तीन केंद्रप्रमुख आणि एक विस्तार अधिकारी यांना पदावनती देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सभेत अलाहाबाद विद्यापीठातून बोगस पदवी धारण केलेल्या ५३ पदवीधर शिक्षकांचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर या सभेत जोरदार चर्चा झाली. या चर्चेमध्ये सभापतींसह सदस्यांनी बोगस पदवीधरांना पदावनती देण्याचा ठामपणे निर्णय घेऊन तसा ठरावही मंजूर केला. शासनाकडून कोणतेही मार्गदर्शन न मागविता थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या पदावनतीचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. गुहागर, संगमेश्वर आणि चिपळूण या ठिकाणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. या तिन्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांचा चार्ज काढून घेण्यात यावा. त्यांच्याऐवजी अन्य विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज द्यावा, असा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. इयत्ता आठवी, शून्य शिक्षकी शाळा आणि तक्रारी असलेल्या शाळांवर कामगिरी शिक्षक काढावेत आणि इतर शाळांमध्ये कामगिरीवर असलेल्या शिक्षकांना त्यांच्या शाळेवर पाठविण्यात यावे, असा महत्त्वाचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. (शहर वार्ताहर)लोकमतचा दणकाअलाहाबाद विद्यापीठातून बोगस पदवी धारण केलेल्या पदवीधरांबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आणि केवळ ‘लोकमत’नेच त्याचा पाठपुरावा केला. या वृत्ताची दखल शिक्षण समितीच्या मागील सभेत घेऊन बोगस पदवीधर शिक्षकांचा अहवाल मागविला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.शिष्यवृत्ती प्रकरणाचीही चौकशीराजापूर तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना व्हरांड्यामध्ये जमिनीवर बसावे लागले होते. त्यामुळे पालक आणि शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या हलगर्जीपणाबद्दल सभेत जोरदार चर्चा होऊन चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती घोसाळकर यांनी दिले.अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधारकांना जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या निर्णयाने झटकातीन प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांचाचार्ज काढणारराजापूर तालुक्यातीलशिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची चौकशी होणारइतर शिक्षकांची कामगिरीरद्द करणार
५१ शिक्षकांच्या पदावनतीचे आदेश
By admin | Updated: March 26, 2015 00:02 IST