शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील अभियंत्याला पाच लाखांचा ऑनलाइन गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 12:33 IST

चिपळूण (जि. रत्नागिरी ) : ॲक्सिस बँकेचे खाते बंद हाेणार असल्याची भीती दाखवून चिपळुणातील खेर्डी एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या एका अभियंत्याची ...

चिपळूण (जि. रत्नागिरी) : ॲक्सिस बँकेचे खाते बंद हाेणार असल्याची भीती दाखवून चिपळुणातील खेर्डी एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या एका अभियंत्याची सुमारे पाच लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. चिपळूण पोलिस स्थानकात मंगळवार, दि. २९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविकरण सीताराम पिंपळे (५०, रा. एमआयडीसी कॉलनी, खेर्डी, मूळ रा. दादर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पिंपळे यांना एका अज्ञाताचा फोन आला. त्याने फोनवरून तुमचे ॲक्सिस बँकेतील खाते बंद होण्याची शक्यता आहे, अशी भीती दाखवली. त्यानंतर व्हॉटस्ॲप मेसेज करून त्यांना एक ॲक्सिस बँक एपीके नावाची फाइल पाठवली. ही फाइल ओपन करून पॅनकार्ड अपडेट करा व एमपिन अपडेट करण्यास सांगितले. आपले बँकेतील खाते बंद होऊ नये, या भीतीने पिंपळे यांनी पॅन कार्ड व एमपिन अपडेट केले.त्यानंतर त्यांच्या खात्यात असलेली १९,३८८ रुपये व मालवेअर ॲपमधून ४ लाख ९२ हजार ११५ रुपयांचे कर्ज घेऊन, या कर्जाची रक्कम पिंपळे यांच्या खात्यात आरोपीने जमा केली. त्यानंतर त्याने ४ लाख ८६ हजार ४९८ रुपये परस्पर दुसरीकडे वळवली. २५ हजार रुपये पिंपळे यांच्या खात्यात सिंग नामक या व्यक्तीने जमा केल्याचे दिसले. यामध्ये पिंपळेची ४ लाख ८६ हजार ४९८ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस