रोप स्किपिंगसाठी ४८ खेळाडूंची निवड
By Admin | Updated: September 25, 2014 00:20 IST2014-09-24T23:59:37+5:302014-09-25T00:20:43+5:30
अहमदनगर येथे स्पर्धा : कासार्डे येथे झाली निवड चाचणी

रोप स्किपिंगसाठी ४८ खेळाडूंची निवड
ठाणे : गणेशोत्सवात चोरून वीज वापरणाऱ्यांविरोधात महावितरणच्या ७० जणांच्या दामिनी पथकाने केलेल्या कारवाईत ४५५ मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील अधिकृत वीजजोडणी दिली होती. त्यानंतर, आता नवरात्रोत्सवाच्या काळातही मंडळांनी चोरून वीज न वापरता महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात वीज घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
दामिनी पथकात कार्यकारी अभियंत्याबरोबर अन्य चार ते पाच कर्मचारी काम करीत असून हे पथक उत्सव काळात अचानक त्या ठिकाणी जाऊन तेथे चोरून वीज वापरली जात असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम करते. अशा प्रकारे चोरून वीज वापरली जात असेल तर त्यांच्याकडून जेवढे दिवस ही वीज वापरली गेली असेल, तेवढ्या दिवसाचे चार्जेस वसूल करून तत्काळ त्यांना तात्पुरत्या स्वरूपातील अधिकृत कनेक्शन देण्याचे कामसुद्धा होत आहे.
आकडे टाकून तसेच अनधिकृत वीज घेण्याच्या प्रकारांमुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे मंडळांनी आॅनलाइन अथवा आपापल्या परिसरातील महावितरणच्या कार्यालयात जाऊन हंगामी स्वरूपाच्या वीजजोडणीसाठी अर्ज करून जोडणी घ्यावी व उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
नवरात्रोत्सवातही दामिनी पथक सज्ज झाले असून हा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी चोरून वीज न वापरण्याचे आवाहन केले आहे.