चिपळूण तालुक्यातील ४५ पाणी नमुने दूषित

By Admin | Updated: July 3, 2014 00:35 IST2014-07-03T00:32:20+5:302014-07-03T00:35:41+5:30

प्रमाण वाढले : सार्वजनिक विहिरी सर्वाधिक दूषित

45 water samples of Chiplun taluka are contaminated | चिपळूण तालुक्यातील ४५ पाणी नमुने दूषित

चिपळूण तालुक्यातील ४५ पाणी नमुने दूषित

अडरे : चिपळूण तालुक्यातील कामथे प्रयोगशाळेत तपासलेल्या ४३७ पाणी नमुन्यांपैकी ४५ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये २४ सार्वजनिक विहिरींचे पाणी सर्वांत जास्त दूषित असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासले जातात. जून महिन्यात चिपळूण तालुक्यातील ४३७ नमुने घेऊन कामथे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये ४५ ठिकाणांचे पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक कर्मचारी हे पाणीपुरवठा करणाऱ्या साधनांमधून पाण्याचे नमुने गोळा करतात. यामध्ये सार्वजनिक विहीर, तलाव, बोअरवेल, पाण्याची टाकी, नळपाणी पुरवठा करणारे नळ यांचा समावेश असतो.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यामध्ये सावर्डे येथील पालवण काष्टेवाडी बोअरवेल, आगवे राणीमवाडी सार्वजनिक विहीर, असुर्डे - खापरेवाडी नळपाणी योजना, कोकरे - घाणेकरवाडी नळपाणी योजना, कोंढचीवाडी सार्वजनिक विहीर, नाभिकवाडी सार्वजनिक विहीर, कोकरे मोहल्ला नळपाणी योजना, बागवेवाडी सार्वजनिक विहीर, गुरववाडी सार्वजनिक विहीर, कामथे बौद्धवाडी नळपाणी योजना, कोंडमळा शिर्केवाडी सार्वजनिक विहीर, पिंपळ मोहल्ला सार्वजनिक विहीर, कासारवाडी सार्वजनिक विहीर, कापसाळ दुकानखोरी सार्वजनिक विहीर या ठिकाणांच्या टाकीतील पाणी पिण्यास अयोग्य आहे.
कापरेअंतर्गत भोम येथील आदवडेवाडी सार्वजनिक नळपाणी, गांग्रई नवरंगवाडी सार्वजनिक नळपाणी पुरवठा, गावणंगवाडी सार्वजनिक नळपाणी पुरवठा, शिरगाव अंतर्गत मुंढे - कातकरीवाडी सार्वजनिक विहीर, खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरळ भुवडवाडी, नळपाणी, बौद्धवाडी नळपाणी, ओमळी सहाणवाडी नळ, ओमळी कांबळेवाडी विहीर, रेहेळेभागाडी, कान्हेरेवाडी विहीर, अडरे प्राथमिक केंद्रअंतर्गत निरबाडे निर्मळवाडी सार्वजनिक विहीर व वालोपे - गणेशवाडी सार्वजनिक नळपाणी योजना, दादर अंतर्गत कळकवणे मधलीवाडी सार्वजनिक नळ, आकले गुरववाडी सार्वजनिक विहीर, तिवरे गंगेचीवाडी बोअरवेल, तिवरे कातकरवाडी सार्वजनिक नळ, वहाळ पिलवली सुतारवाडी सार्वजनिक टाकी, पिलवली वाकडेवाडी सार्वजनिक विहीर, तुरंबव धनगरवाडी विहीर, कळंबट केरे सार्वजनिक नळ, कळंबट केरे बौद्धवाडी सार्वजनिक नळ, फुरुस कुटरे, शिर्केवाडी नळपाणी पुरवठा, कुटरेवरचीपेठ नळपाणी, डेरवण विठोबाचीवाडी विहीर, फौजदारवाडी, खालची बौद्धवाडी, सहाणवाडी विहीर, रामपूर वाघिवरे मोहल्ला सार्वजनिक नळपाणी, डुगवे सोनवणे बौद्धवाडी सार्वजनिक विहीर, गणेशवाडी व साखरवाडी सार्वजनिक विहीर येथील पाणी पिण्यास अयोग्य आहे. (वार्ताहर)

Web Title: 45 water samples of Chiplun taluka are contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.