शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील ११ गावांतील ४,३७६ ग्राहक अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:42 IST

खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीत

रत्नागिरी : गेले चार दिवस जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वारे, मुसळधार पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. जिल्ह्यातील १,१५३ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पैकी ११४२ गावातील वीजपुरवठा पूर्ववत झाला असून, अद्याप ११ गावांतील ४,३७६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.जिल्ह्यातील १८ उपकेंद्रे बाधित झाली होती. मात्र, सर्व उपकेंद्रे पूर्ववत करण्यास यश आले आहे. उच्चदाब १०३ वाहिन्या बंद पडल्या होत्या त्यापैकी १०१ वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. दाेन वाहिन्या मात्र अद्याप बंद आहेत. लघुदाब वाहिनीचे एकूण ११६ वीजखांब पडले होते, त्यापैकी ५७ खांब उभे करण्यात आले आहेत. तसेच उच्चदाब वाहिनीचे ६१ खांब पडले होते, त्यापैकी २२ खांब उभे केले आहेत. एकूण ५५७५ रोहित्रे ठप्प झाली होती.त्यापैकी ५,५२२ रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. एकूण बाधित ११५३ गावांपैकी ११४२ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, ३,३६,०९३ ग्राहकांपैकी ३,३१,७१७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे ३९ लाखांंचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. वीजपुरवठा लवकर सुरू करण्याकरिता महावितरणचे कर्मचारी व अधिकारी परिश्रम घेत आहेत.खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीतमंडणगड तालुक्यातील ३३ केव्ही केरील वाहिनीवर तुळशी गावात वीज पडल्यामुळे वाहिनी बंद पडली होती. एकूण ४३ इन्सुलिटर्स बदलावे लागले. तुळशी गाव, देव्हारे, बाणकोट या परिसरातील जंगलातून ही वाहिनी येत असल्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांनी अथक परिश्रमाने वाहिनीवरील वीज पुरवठा सुरळीत केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण