२१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 03:26 PM2021-01-06T15:26:15+5:302021-01-06T15:28:17+5:30

evm ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींपैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

4332 candidates in the fray for 2107 seats | २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

२१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

googlenewsNext
ठळक मुद्दे२१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात१५ जानेवारी रोजी मतदान, १८ जानेवारीला होणार उमेदवारांचा फैसला

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींपैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अनलॉक प्रक्रियेनंतर ४७९ ग्रामपंचायतींच्या १५०९ प्रभागांमधील ३९२१ सदस्यांसाठी या निवडणुका होणार आहेत.

यासाठी ७२०३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ८० अर्ज बाद झाले तर माघारीच्या दिवशी १०४८ उमेदवारांनी माघार घेतली. ११९ ग्रामपंचायतींतील १८१४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ४७९ पैकी ३६० ग्रामपंचायतींच्या ४३३२ सदस्यांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून प्रवर्गाचा फायदाही महिलांना मिळणार आहे. मतदानासाठी १५९३ केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. १८ रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार उमेदवारांचा फैसला होणार आहे.

संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात

संगमेश्वर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यासाठी ११८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. १६१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. १९ ग्रामपंचायतींच्या २९८ उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी सर्वाधिक ७२९ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

सर्वाधिक बिनविरोध उमेदवार चिपळूण तालुक्यात जिल्ह्यातील एकूण ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तसेच १८१४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची सर्वाधिक संख्या खेड (२३) तर सर्वांत कमी मंडणगड तालुक्यात (२) आहे. मात्र, बिनविरोध उमेदवारांची सर्वाधिक संख्या चिपळूण (३४३) असून सर्वांत कमी मंडणगडात (४९) आहेत.

महिला मतदारांची संख्या अधिक

जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आयोगाकडून घोषित करण्यात आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींचे एकूण मतदार ६ लाख ७५ हजार ५४१ आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या ३ लाख २७ हजार ३७४ तर स्त्री मतदार ३ लाख ४८ हजार १५५ आहे तसेच अन्य मतदारांची संख्या १२ आहे. जिल्ह्यात स्त्री मतदारांची संख्या २० हजारांनी अधिक असल्याने त्यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title: 4332 candidates in the fray for 2107 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.