शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:36 IST

ऑनलाईन खरेदीसाठी भरलेली रक्कम ५११ रुपये परत देण्याच्या बहाण्याने झीपर शॉप या वेबसाईटच्या कस्टमर केअर नं.९३३०९५४७३१ वरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्टेट बॅँक ऑफ इंडिया शाखा साळवी स्टॉप, रत्नागिरीमधील खाते नंबर व त्याचा तपशील मागूून घेतला. त्यादवारे त्याने नाचणेतील व्यक्तीची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत ५० हजारांची ऑनलाईन फसवणूकअज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : ऑनलाईन खरेदीसाठी भरलेली रक्कम ५११ रुपये परत देण्याच्या बहाण्याने झीपर शॉप या वेबसाईटच्या कस्टमर केअर नं.९३३०९५४७३१ वरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्टेट बॅँक ऑफ इंडिया शाखा साळवी स्टॉप, रत्नागिरीमधील खाते नंबर व त्याचा तपशील मागूून घेतला. त्यादवारे त्याने नाचणेतील व्यक्तीची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.परत मिळणारी ५११ रुपये रक्कम खात्यात जमा करण्यासाठी झीपर वेबसाईटच्या कस्टमर केअरमधून एका अनोळखी व्यक्तीचा फोन पंकज शशिकांत दळवी (२६, औषध प्रतिनिधी (एमआर) सौभाग्यनगर, नाचणेरोड, रत्नागिरी) यांना आला. त्या व्यक्तीने पंकज यांच्याकडून बॅँक खाते नंबर व अन्य तपशील घेतला.त्यानंतर काहीवेळाने पंकज यांच्या खात्यातील ४९९९८ रुपये रक्कम काढल्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर आला. त्या अनोळखी व्यक्तीने या खात्यातील ४९,९९८ रुपये काढून घेतले व फसवणूक केली. याबाबतची तक्रार पंकज दळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२०, ४०३, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) नुसार मंगळवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी