आषाढीपूर्वी पंढरपुरात साकारणार ४ हजार शौचालये
By Admin | Updated: June 23, 2014 01:08 IST2014-06-23T01:08:34+5:302014-06-23T01:08:34+5:30
प्रवीण गेडाम: कायमस्वरूपीसह तात्पुरत्या शौचालयांचा समावेश

आषाढीपूर्वी पंढरपुरात साकारणार ४ हजार शौचालये
रत्नागिरी : सॅफरॉन कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी आज, रविवार सायंकाळपर्यंत शहर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार १०० गुंतवणूकदारांकडून ‘सॅफरॉन’ने २ कोटी ११ लाख १ हजार २७० रुपये रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले. दामदुप्पट योजनेंतर्गत या ग्राहकांना १० कोटी ६६ हजार रुपयांचे धनादेश कंपनीकडून दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप मिसर यांनी दिली.
सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लोकांना पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड, मुंबईत मुख्य सूत्रधार शशिकांत राणे याला मुलुंड (मुंबई) पोलिसांनी अटक केली असून, त्याला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे; तर रत्नागिरीत या प्रकरणी शहर पोलिसांनी ऐश्वर्या गावकर (उत्कर्षनगर, कुवारबाव) व रश्मी मांडवकर (नाचणे, रत्नागिरी) या सॅफरॉनच्या रत्नागिरी कार्यालयात त्यावेळी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या दोन महिलांना अटक केली असून, त्यांची पोलीस कोठडी उद्या, सोमवारी संपत आहे. सॅफरॉनकडून रत्नागिरीतील १५०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून, फसवणुकीची मुद्दलच २० कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे. शहर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत या तपासाला अधिक गती दिली असून, दोन्ही महिला संशयित आरोपींच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली. झडतीत गुंतवणूकदारांशी झालेल्या आर्थिक व्यवहारांची अनेक कागदपत्रे, बॅँक खाते पुस्तके तसेच धनादेश जप्त करण्यात आले आहेत. कंपनीने केलेल्या गुंतवणुकींची माहितीही मिळाली आहे. त्यामुळे आरोपींविरोधातील पुरावे अधिक भक्कम झाले आहेत. (प्रतिनिधी)