लांजात कोरोनाचे ४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:00+5:302021-09-14T04:38:00+5:30

लांजा : सोमवारी लांजात कोरोनाचे ४ रुग्ण आढळले आहेत. रविवारी एकही रुग्ण न आढळल्याने मिळालेला दिलासा औटघटकेचा ठरला आहे. ...

4 new patients with coronary artery disease | लांजात कोरोनाचे ४ नवे रुग्ण

लांजात कोरोनाचे ४ नवे रुग्ण

लांजा : सोमवारी लांजात कोरोनाचे ४ रुग्ण आढळले आहेत. रविवारी एकही रुग्ण न आढळल्याने मिळालेला दिलासा औटघटकेचा ठरला आहे.

मागील सलग चार दिवसांमध्ये रोज कोरोनारुग्ण आढळल्याने चिंता वाढली होती. मात्र, रविवारी एकही रुग्ण न आढळल्याने थोडा दिलासा मिळाला. हा दिलासा औटघटकेचा ठरला असून, सोमवारी अँटिजन चाचणीत ३ तर आरटीपीसीआर चाचणीत १ असे एकूण ४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये लांजा नाईकवाडी, लांजा शासकीय विश्रामगृह परिसर, लांजा कुक्कुटपालन, कोर्ले या ठिकाणचा प्रत्येकी १ रुग्ण आहे.

तालुक्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या ३,८७३ झाली आहे. त्यामधून ३,७२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात २२ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: 4 new patients with coronary artery disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.