रत्नागिरी जिल्ह्यात ३९५ कोरोनाबाधित रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:22+5:302021-06-01T04:24:22+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३९५ रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या ३६,४३९ झाली आहे. कोरोनाने ...

रत्नागिरी जिल्ह्यात ३९५ कोरोनाबाधित रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३९५ रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या ३६,४३९ झाली आहे. कोरोनाने १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १,२३९ झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने, जिल्ह्यात दोन दिवसांत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सापडलेेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील २७२ रुग्ण तर अँटिजन चाचणीतील १२३ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात १५० रुग्ण, मंडणगड, गुहागरात प्रत्येकी २, दापोलीत ४, खेडमध्ये १, चिपळुणात ३४, संगमेश्वरात ८२, लांजात २३ आणि राजापुरात ४१ रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.७३ टक्के आहे.
जिल्ह्यात खासगी रुग्णालयात ५ तर शासकीय रुग्णालयात ८ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ५ जण, चिपळुणातील ३, राजापुरात २ आणि संगमेश्वर, लांजा, खेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ७ पुरुष रुग्ण आहेत. मृत्यूचे प्रमाण ३.४० टक्के आहे.