जयगड पाेलिसांकडून एकाच दिवशी ३८ लिटर दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:33 IST2021-05-08T04:33:42+5:302021-05-08T04:33:42+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड पोलिसांनी शुक्रवारी ३ ठिकाणी गावठी दारू हातभट्टीवर धाडी टाकून ३८ लिटर दारू जप्त केली ...

38 liters of liquor seized from Jaigad police on the same day | जयगड पाेलिसांकडून एकाच दिवशी ३८ लिटर दारू जप्त

जयगड पाेलिसांकडून एकाच दिवशी ३८ लिटर दारू जप्त

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड पोलिसांनी शुक्रवारी ३ ठिकाणी गावठी दारू हातभट्टीवर धाडी टाकून ३८ लिटर दारू जप्त केली आहे़ ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़

जयगड येथील गणेशवाडी येथे ४५० रुपये किमतीची ९ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी प्रकाश यशवंत पावरी (४९, रा. गणेशवाडी जयगड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी करीत आहेत.

तसेच वाटद येथील परटवणे तेलीवाडी येथे सकाळी ८़ ३० वाजता टाकण्यात आलेल्या धाडीत १००० रुपये किमतीची १९ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. शलाका शंकर रहाटे (वय ४७, रा. वाटद परटवणे,तेलीवाडी) हिच्याविरोधात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे़ याचा तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल रमेश गावित करीत आहेत.

मालगुंड खेऊरवठार येथे सकाळी ९.०५ वाजता धाड टाकण्यात आली़ या धाडीत ७५० रुपये किमतीची १० लिटर गावठी दारू जप्त केली आहे. नयन महादेव खेऊर (वय ४४, रा. मालगुंड खेऊरवाडी) याच्याविरोधात जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करीत आहेत.

Web Title: 38 liters of liquor seized from Jaigad police on the same day