चिपळूणमध्ये ३४ हजार मतदार बजावणार मताधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 14:23 IST2017-09-28T13:49:48+5:302017-09-28T14:23:30+5:30

येत्या आॅक्टोबर महिन्यात ३४ ग्रामपंचायतीच्या ९८ प्रभागातील २४८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाच्या सर्वाधिक ९९ जागा आहेत. यासाठी ३३ हजार ६११ मतदार मतदान करणार आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे.

34,000 voters to vote in Chiplun | चिपळूणमध्ये ३४ हजार मतदार बजावणार मताधिकार

चिपळूणमध्ये ३४ हजार मतदार बजावणार मताधिकार

ठळक मुद्दे३४ ग्रामपंचायतीचे ९८ प्रभागात २४८ जागा ३३ हजार ६११ मतदार मतदान करणार १६ हजार ४४५ पुरुष व १७ हजार १६५ महिला मतदारांचा समावेश महिला मतदारांचाची संख्या अधिक

चिपळूण दि. २८ : येत्या आॅक्टोबर महिन्यात ३४ ग्रामपंचायतीच्या ९८ प्रभागातील २४८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाच्या सर्वाधिक ९९ जागा आहेत. यासाठी ३३ हजार ६११ मतदार मतदान करणार आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे.

दि.१६ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. मालदोली, बिवली, करंबवणे, केतकी, भिले, नारदखेरकी, आबिटगाव, खांडोत्री, गुढे, डुगवे, ढाकमोली, गुळवणे, परशुराम, नवीन कोळकेवाडी, शिरवली, देवखेरकी, गोंधळे-मजरेकौंढर, बामणोली, आंबतखोल, धामेली कोंड, कामथे खुर्द, गाणे या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ७, कापरे, ओमळी, वहाळ, खांदाटपाली, उमरोली, असुर्डे, कामथे, कळकवणे या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ९, पेढे, शिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ११ जागांसाठी निवडणूक होत आहे.

३४ ग्रामपंचायतीचे ९८ प्रभागात २४८ जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जाती ६, अनुसूचित जमाती १, नागरिकांचा मागासप्रवर्ग ३२, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३४, सर्वसाधारण स्त्री ९९ व सर्वसाधारणच्या ७६ जागांचा समावेश आहे. यासाठी ३३ हजार ६११ मतदार यामध्ये १६ हजार ४४५ पुरुष व १७ हजार १६५ महिला मतदारांचा समावेश आहे.


 

Web Title: 34,000 voters to vote in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.