शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात ३० वळणे होणार गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:44 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

ठळक मुद्देमिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू, वाहतुकीसाठी बनणार निर्धोक

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही महामार्गांच्या चौपदरीकरणामध्ये ही सर्व ३० धोकादायक वळणे गायब होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही महामार्ग वाहतुकीसाठी निर्धोक बनणार आहेत.

कोकणातील रस्ते हे डोंगर-दºयांमधून गेलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र उतार किवा तीव्र चढाचा रस्ता आहे. नागमोडी वळणेही अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरून तसेच मुंबई - गोवा महामार्गावरून विशेषत: रात्री व पहाटेच्या वेळी वळणांचा अंदाज न आल्याने  आजवर अनेक मोठे अपघात झाले. त्यामध्ये जीवित हानीबरोबरच अनेक जखमींना कायमचे अपंगत्वही आले आहे. गेल्या काही वर्षात मुंबई-गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा अर्थात डेड ट्रॅक म्हणून ओळखला जात होता. या महामार्गाचा सर्वाधिक वापर कोकणवासियांकडून सणांसाठी, उन्हाळी हंगामात गावी येण्यासाठी केला जातो. त्यामुळेच गेल्या दोन दशकांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. 

सन २०१३मध्ये युपीए सरकारच्या काळात या महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात आलेल्या भाजपाप्रणित मोदी सरकारमधील मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कॉँक्रीटीकरणातून करण्याचा निर्णय घेतला व कामाला गती दिली. त्यानंतर आता अनेक वर्षे रखडलेल्या मिºया - रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

घाटमाथ्यावरून कोकणात येण्यासाठी कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग, तर मुंबईतून कोकणात येण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गाचा वापर होतो. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी घाट, भोस्ते घाट, महामार्गावरील कामथे, वेरळ, आंजणारी घाट व परिसरातील रस्ता हा वाहनचालकांसाठी अडचणीचा ठरत आला आहे. आतापर्यंत खेडमधील कशेडी घाटात वळसा घालून यावे लागत होते. आता चौपदरीकरणात कशेडी घाटात बोगदा खोदण्यात आल्याने काही किलोमीटर प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.

सध्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात आहे. मात्र, हे काम रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमध्ये रखडले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या दोन्ही महामार्गावरील धोकादायक वळणे, ठिंकाणे यांचे सर्वेक्षण केले. मिºया - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट येथील दख्खनचे वळण व नाणीज गावातील धोकादायक ठिकाणी बांधकाम विभागाने उपाययोजना केल्या आहेत. आता मुंबई - गोवा महामार्गावरील २८ ठिकाणीही उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

 

बांधकामकडून सर्वेक्षण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळी अनेक धोकादायक वळणे असलेल्या ठिकाणी रस्ता सरळ करण्यासाठी रेखांकन करण्यात आले आहे. वळणे कमी ठेवण्याचा प्रयत्न चौपदरीकरणाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात याबाबतचे सर्वेक्षण रत्नागिरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. 

 

३० ठिकाणे धोकादायक

बांधकाम विभागाने महामार्गावरील अपघातप्रवण तथा धोकादायक वळणांचा सर्वे केला असता ३० ठिकाणे धोकादायक आढळून आली. त्यामध्ये उधळे, भोस्ते घाट, आवाशी गाव, चिपळूणचा पागनाका, कोंंडमळा, आगवे-सावर्डे गाव, तुरळ गाव, आरवली, वांद्री, आंबा घाट, निवळी घाट, हातखंबा गाव, पाली, नाणीज, वेरळ, लांजा बाजारपेठ, कुवे, ओणी, कोदवली, राजापूर शहर भाग यांचा समावेश आहे.

टॅग्स :highwayमहामार्गkonkanकोकण