शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जालगाव येथील व्यापाऱ्याची ३० लाख ७३ हजाराची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:39 IST

Crimenews, Fraud, Police, Ratnagirinews एका महिलेने ९३ लाख रुपये किमतीचे पाउंड कुरियरने पाठवले आहेत. ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ३० लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजालगाव येथील व्यापाऱ्याची ३० लाख ७३ हजाराची फसवणूकदापोली पोलीस स्थानकात विरोधात तक्रार दाखल

दापोली : एका महिलेने ९३ लाख रुपये किमतीचे पाउंड कुरियरने पाठवले आहेत. ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ३० लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.जालगाव येथील विजय प्रभाकर खोत यांची जानेवारी २० मध्ये अमेलिया जॅक्सन नावाच्या लंडन येथील एका महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. फेब्रुवारीमध्ये या महिलेने खोत यांच्या व्हाट्सॲपवर एक पार्सल पाठविले आहे, असा मेसेज केला, पार्सलमध्ये असलेल्या वस्तूंचे फोटोही व्हाट्सॲपवर टाकले. त्यानंतर प्रिया शेठ या महिलेने तुमचे विमानतळावर कुरियर आले आहे.

त्यात फोटोत दाखविलेल्या वस्तू व ९३ लाख रुपये किमतीचे पाउंड आहेत, त्यांनी यासंदर्भात कस्टम व रिझर्व्ह बँक या शासकीय आस्थापना यांची प्रमाणपत्रेही पाठविली होती, ही कागदपत्रे खरी असतील हे गृहीत धरून खोत यांनी त्यांच्याकडे मागणी केली जात होती.तसे बँकेत पैसे भरले, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने खोत याना दोन एटीम कार्डही पाठवली. या एटीएमद्वारे खोत यांनी २ वेळा पैसेही काढले, या सर्व प्रकारात खोत यांनी तब्बल ३० लाख ७३ हजार १०० रुपये या व्यक्तींनी पाठविलेल्या ई-मेल मध्ये दिलेल्या बँक खात्यात भरणा केले. त्यानंतर खोत याना कुरियर काही आले नाही.

आपली फसवणूक झाल्याचे विजय खोत यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस स्थानकात अमेलिया जॅक्सन, प्रिया शेठ, पूजा शर्मा यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीRatnagiriरत्नागिरी