चिपळूण बँक निवडणुकीसाठी ३० अर्ज

By Admin | Updated: May 14, 2015 23:58 IST2015-05-14T22:31:03+5:302015-05-14T23:58:26+5:30

राजकारणाला ऊत : अनेक जुन्या संचालकांचे रिंगणात उडी, बिनविरोध विजयासाठी प्रयत्न

30 applications for Chiplun Bank elections | चिपळूण बँक निवडणुकीसाठी ३० अर्ज

चिपळूण बँक निवडणुकीसाठी ३० अर्ज

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेसाठी १४ जून रोजी निवडणूक होत असून, आज (गुरुवारी) दिवसभरात सहाय्यक निबंधक कार्यालयात ३० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष संजय रेडीज व त्यांच्या जुन्या अनेक सहकाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. सहाय्यक निबंधक कार्यालयात आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी दापोलीचे सहाय्यक निबंधक आर. के. बांगर यांच्या उपस्थितीत एकूण ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये विद्यमान चेअरमन संजय रेडीज, व्हाईस चेअरमन मोहन मिरगल, संचालक अनिल दाभोळकर, सतीश खेडेकर, अ‍ॅड. दिलीप दळी, मंगेश तांबे, निहार गुढेकर, राधिका पाथरे यांचा समावेश आहे. याशिवाय सहकार पॅनलमधून नीलेश भुरण, प्रशांत शिरगावकर, अजय खातू, समीर जानवलकर यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. सहकार पॅनेलच्या दोन जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. सहकार पॅनेल हे सर्वपक्षीय पॅनेल करुन बँकेचा कारभार एकमुखी करण्याचा सहकार पॅनेलच्या प्रमुखांचा निर्धार आहे.
याशिवाय इम्तियाज परकार, समीर टाकळे, सुनील टेरवकर - सर्वसाधारण, सुनील टेरवकर - इतर मागास, प्रशांत शिरगावकर, प्रशांत शिरगावकर - इतर मागास, संजय रेडीज - इतर मागास, संजय रेडीज - सर्वसाधारण, अनिल दाभोळकर, दिलीप दळी, सतीश खेडेकर, सचिन बाईत - सर्वसाधारण, सचिन बाईत - विमुक्त भटकी जमात, चंद्रकांत बाईत - विमुक्त भटकी जमात, चंद्रकांत बाईत - सर्वसाधारण, रहिमान दलवाई, मंगेश तांबे, निहार गुढेकर, समीर जानवलकर - अनुसूचित जाती जमात, मोहन मिरगल - सर्वसाधारण, मोहन मिरगल - विमुक्त भटकी जमात, राधिका पाथरे - महिला, नीलेश भुरण - विमुक्त भटकी जमात, नीलेश भुरण - सर्वसाधारण, दीपक विखारे, राजन कुडाळकर, राजेश केळसकर - सर्वसाधारण, प्रवीण तांबट - इतर मागासवर्ग, राजेश केळसकर - विमुक्त भटकी जमात, धनंजय खातू यांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बांगर यांना प्रियांका माने सहाय्य करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सहकार पॅनेलच्या उमेदवारांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)


माजी चेअरमन सुचय रेडीज, माजी आमदार बापू खेडेकर, अध्यक्ष संजय रेडीज यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय सहकार पॅनेल १५ जागांसाठी कार्यरत आहे. विद्यमान संचालकांतून छाया खातू, विलास चिपळूणकर, राजन कुडाळकर, दीपक विखारे, उमेश काटकर, भालचंद्र बिर्जे व सुचय रेडीज हे रिंगणाबाहेर असतील. सुचय रेडीज यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे, तर मागच्या निवडणुकीत निहार गुढेकर व मंगेश तांबे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांना सहकार पॅनलमध्ये संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून एक महिला व पुरुष संचालकाला संधी देण्यात येणार आहे. मुस्लिम उमेदवारालाही जागा देण्यात येणार आहे.


चिपळूण मतदार संघात सर्वसाधारण १४
चिपळूण बाहेरील सर्वसाधारण मतदार संघात ५
भटक्या विमुक्त जाती ५
इतर मागासवर्ग ४
अनुसूचित जाती जमाती १
महिला राखीव १.
अनेक जुन्या संचालकांचेही अर्ज दाखल.

Web Title: 30 applications for Chiplun Bank elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.