‘करमणुकी’तून ३ कोटी

By Admin | Updated: January 30, 2015 23:13 IST2015-01-30T22:57:06+5:302015-01-30T23:13:31+5:30

सर्वाधिक वसुली लांजात : मार्चअखेर उद्दिष्टपूर्ती होणार

3 crore from 'amusement' | ‘करमणुकी’तून ३ कोटी

‘करमणुकी’तून ३ कोटी

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने डिसेंबरअखेर ७३.६४ टक्के इतके उद्दिष्ट साध्य करीत जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत २ कोटी ९१ लाखाचा महसूल जमा केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वसुली लांजा तालुक्याने (८५.८८ टक्के) केली असून मंडणगड तालुक्याची वसुली (२९.७१ टक्के) सर्वांत कमी आहे चित्रपटगृह, व्हिडीओ खेळघर, सायबर कॅफे तसेच डीटीएचधारकांकडून मिळणाऱ्या करापोटी जिल्हा करमणूक कर शाखेला महसूल मिळत असतो. २०१४ - १५ या आर्थिक वर्षाकरिता करमणूक शाखेला ३ कोटी ९५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबरअखेर २ कोटी ९० लाख ८६ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. यात लांजा तालुका अग्रेसर आहे. त्यापाठोपाठ दापोली व संगमेश्वर हे तालुके अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत.
गतवर्षी या शाखेने मार्चअखेर उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळविला होता. मात्र, यावर्षी जिल्ह्यात एप्रिलमध्ये लोकसभा झाल्या. या निवडणुकीची धामधुम संपते न संपतो तोच पाठोपाठ अवघ्या चारच महिन्यांनी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. या दोन्ही निवडणुकांच्या प्रक्रियेत अधिकारी तसेच कर्मचारीवर्ग अडकल्याने वसुलीत खंड पडला. मात्र, त्यानंतर आता या शाखेने वसुलीची जोरदार मोहीम उघडली आहे.
जिल्ह्यात चित्रपटगृहांची संख्या कमी झाली आहे. टी. व्ही, कॉम्प्युटर याचा फटका व्हिडीओ खेळघर, सायबर कॅफे यांना चांगलाच बसला असल्याने त्यांचीही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यापासून करमणूक कर शाखेला मिळणारा महसूलही कमी झाला आहे. मात्र, सध्या डीटीएचधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने डीटीएच करापोटी १ कोटी ९४ लाख २६ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे मार्च २०१५ पर्यंत उद्दिष्टपूर्ती १०० टक्के होईल, असा विश्वास सहायक करमणूक कर अधिकारी रवींद्र खानविलकर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)


डीटीएचधारक वाढल्याने महसूल वाढला
जिल्ह्यात चित्रपटगृहांची संख्या कमी झाली आहे. व्हिडीओ खेळघर आणि सायबर कॅफेनांही टी. व्ही., संगणक, मोबाईल यांचा फटका चांगलाच बसल्याने काही यापैकी काही बंद झाले आहेत. त्यामुळे यापासून मिळणारा महसूल कमी झाला आहे. मात्र, डीटीएचधारक वाढल्याने महसूल वाढला आहे.

तालुकाइष्टांक वसुली
मंडणगड१.७५०.५२
दापोली६४.६५
खेड२०२.२१
चिपळूण४५८.४४
गुहागर८६.२४
संगमेश्वर५.०५३.९१
रत्नागिरी५४.३५.८३
लांजा१.७१.४६
राजापूर््५.२३.३४
एकूण१४७९६.६
डिटीएच२४८१९४.२६
एकूण३९५२९०.८६

Web Title: 3 crore from 'amusement'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.