शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात दाखल, ३१ जणांवर उपचार सुरू

By शोभना कांबळे | Updated: December 17, 2024 17:48 IST

सखोल चौकशी हवी

रत्नागिरी : उपचार घेऊन घरी गेलेल्या जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थ्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह वायूगळतीमुळे त्रास झालेल्या दोन प्रौढांनाही आता त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात ३१ जणांवर उपचार सुरु आहेत.गुरुवार, १२ रोजी जिंदल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे जवळच्याच जयगड माध्यमिक विद्यामंदिर येथील ६८ विद्यार्थ्यांना त्रास झाला. त्यातील पहिल्या ८ मुलांना वाटप प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर त्यानंतर ६० मुलांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळेल त्या वाहनाने या मुलांना रत्नागिरीत आणण्यात आले. यात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. दोन दिवसांनी १४ डिसेंबर रोजी मुलांना घरी पाठवण्यात आले. मात्र, त्यातील २९ मुलांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केवळ मुलांनाच नाही तर आता प्रौढांनाही वायुगळतीमुळे त्रास झाला असल्याचे आता पुढे येत आहे. सोमवारी जयगड येथील दोन प्रौढांनाही रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता एकूण ३१ रुग्ण उपचार घेत आहेत.सखोल चौकशी हवीवायुगळती नेमकी कशामुळे झाली, याची सखोल आणि नि:पक्षपाती चौकशी व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थी