अडीच महिन्यात ८ कोटी
By Admin | Updated: July 21, 2016 00:56 IST2016-07-20T23:10:05+5:302016-07-21T00:56:31+5:30
महामहसूल : महावितरणच्या आॅनलाईन पद्धतीला पसंती

अडीच महिन्यात ८ कोटी
रत्नागिरी : वीजबिल भरण्यासाठी दरमहा रांगेत उभे राहण्यापेक्षा घरबसल्या आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांची पसंती अधिक आहे. मे महिन्यापासून १६ जुलैअखेर जिल्ह््यातील ५५ हजार ४३९ ग्राहकांनी वीजबिल आॅनलाईन भरणा केले असून, यातून ८ कोटी ४८ लाख ७५ हजार ५४० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.
मे महिन्यामध्ये २१ हजार ४६६ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्याने यातून ३ कोटी १४ लाख ६५ हजार ८९५ रूपयांचे उत्पन्न महावितरणला मिळाले. तर जून महिन्यामध्ये २० हजार ४४० ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे ३ कोटी ३६ लाख २ हजार ७९५ रूपये तर जुलै महिन्याच्या १६ तारखेपर्यंत १३ हजार ५३३ ग्राहकांनी वीजबिल आॅनलाईन भरणा केले असून, यातून १ कोटी ९८ लाख ६ हजार ८५० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.
सध्या स्मार्टफोनचा वापर वाढल्याने इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध होते. यामुळे ग्राहक सर्रास या आॅनलाईन सुविधांचा वापर करू लागले आहेत. या आॅनलाईन वीजबिल भरण्यातून महावितरणला महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न प्राप्त होत आहे.
मे महिन्यामध्ये चिपळूण विभागातील ५ हजार ७५० ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्याने ७९ लाख ५१ हजार ६३० रूपये, खेड विभागातील ४३६१ ग्राहकांकडील वीजबिलांतून ७५ लाख २५ हजार २४० रूपये, रत्नागिरी विभागातील ११ हजार ३५५ ग्राहकांकडील वीजबिल भरण्यातून १ कोटी ५९ लाख ८९ हजार २५ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.
जून महिन्यात चिपळूण विभागातील ५ हजार ५५४ ग्राहकांकडील वीजबिल भरण्यातून ८० लाख ६९ हजार ८४० रूपये, खेड विभागातील ४१४६ ग्राहकांकडून ९२ लाख ७१ हजार ११० रूपये, रत्नागिरी विभागातील १० हजार ७४० ग्राहकाकडील वीजबिल भरल्यातून १ कोटी ६२ लाख ६१ हजार ८४५ रूपये तसेच १६ जुलैअखेर चिपळूण विभागातील ३ हजार ३२७ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्याने ४७ लाख ९९ हजार ३७० रूपये, खेड विभागातील २ हजार ८४५ ग्राहकांकडून ५५ लाख २५ हजार ११० रूपये, रत्नागिरी विभागातील ७ हजार ३६१ ग्राहकांकडून ९४ लाख ८२ हजार ३७० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)