रत्नागिरी : शासनाच्या आदेशानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५०४९ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातील २४ शिक्षक कोरोना संक्रमित सापडले आहेत. कोरोनाबाधितांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील शिक्षकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.कोरोनामुळे शाळांचे ऑनलाईन अध्यापन सुरू होते. शासनाने दि. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानुसार शाळांनी पालकांकडून संमतीपत्रक घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या भीतीमुळे ५० टक्केच पालक मुलांना शाळेत पाठवत आहेत. जिल्ह्यातील एकूण २१७४ शाळांपैकी केवळ १६३२ शाळा सुरू झाल्या आहेत. तर ७२,१०२ विद्यार्थ्यांपैकी ३४,९०७ विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती आहे.जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५,३९४ शिक्षकांपैकी ५,०३४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील २४ शिक्षक कोरोना संक्रमित सापडले आहेत. तसेच १२२७ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी १२१७ कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र, एकही कर्मचारी कोरोना संक्रमित सापडलेला नाही.शाळा बंदरत्नागिरी शहरातील एका शाळेतील एक शिक्षक कोरोनाबाधित आढळला. शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळताच दुपारनंतर शाळा सोडण्यात आली. त्यानंतर ही शाळा ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच पावस येथील प्रशालेतही शिक्षक कोरोनाबाधित आढळताच ही शाळा पाच दिवस बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले. या शाळेत दुसऱ्यांदा शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २४ शिक्षक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 15:37 IST
School Ratnagiri- शासनाच्या आदेशानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५०४९ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातील २४ शिक्षक कोरोना संक्रमित सापडले आहेत. कोरोनाबाधितांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील शिक्षकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २४ शिक्षक कोरोनाबाधित
ठळक मुद्देशाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्के संगमेश्वर तालुक्यात शिक्षकांचे प्रमाण सर्वाधिक