शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूकीसाठी रत्नागिरी विभागातून २२५ बसेस आरक्षित 

By मेहरून नाकाडे | Updated: April 27, 2024 17:23 IST

रत्नागिरी : लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी तसेच मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी दोन दिवसासाठी रत्नागिरी विभागातून ...

रत्नागिरी : लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी तसेच मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी दोन दिवसासाठी रत्नागिरी विभागातून २२५ एसटी बसेसचे आरक्षण करण्यात आले आहे. मतदानासाठी जाणाऱ्या पथकांना जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत दि. ६ मे रोजी नेऊन सोडणे व दि. ७ मे रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी या बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये दि.७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला असून मतदानापूर्वी आवश्यक असलेली तयारी सुरू आहे. कर्मचारी-अधिकारी प्रशिक्षण, ईव्हीएमवर मतपत्रिका सिलिंग करणे, मतपत्रिका गावातून वाटण्याची कामे सुरू आहेत. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. स्टाँगरूममध्ये ईव्हीएम युनिट ठेवली असून त्याचेही वितरण करण्यात येणार आहे.मतदानापूर्वी प्रशासनाने बहुतांश तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी २२५ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली. मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी, ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी एसटी बसेसची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघ निहाय बसेसचे आरक्षण करण्यात आले असून दि. ६ व ७ रोजी उपलब्ध केल्या जाणार आहे. तत्पूर्वी कर्मचारी प्रशिक्षण सुरू असून त्यासाठीही मागणीनुसार बसेस उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती विभागनियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४