शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायती टीबीमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:44 IST

लवकरच होणार सन्मान, क्षयरोग निर्मूलन उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

रहिम दलालरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी २१४ ग्रामपंचायती आता टीबीमुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.केंद्र शासनाने  देशाला टीबीमुक्त करण्याचे धोरण आखले असून, रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे.  त्यासाठी वार्षिक एक हजार लोकसंख्येमध्ये कमीत कमी ३०  टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्या थुंकी नमुन्याची तपासणी करण्यात आली.  तसेच १०० टक्के निक्षय पोषण योजना व पोषण आहार दिलेला असावा, असे विविध निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायती टीबीमुक्त म्हणून पात्र ठरल्या आहेत.

सुवर्ण प्रमाणपत्रटीबीमुक्त ग्रामपंचायत उपक्रमामध्ये पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्य, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि सलग तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्ण  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

शासनाचा खासगी रुग्णालयांशी करारजिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये थुंकी तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर संशयित रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येते. तसेच काही खासगी रुग्णालयांशीही शासनाने करार केला आहे. त्यामध्ये मोफत एक्स-रे  काढण्यात येतात, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.

जिल्ह्यात शोधमोहिमेत आढळले ५१० क्षयरुग्णक्षयरुग्ण जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात  सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये  जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ३११ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ३ हजार ३५५ संशयित क्षयरुग्ण शोधण्यात आले. त्यांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली तसेच एक्स-रे  काढण्यात आले. त्यामध्ये ४२  क्षयरुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण ५१० क्षयरुग्ण आहेत.

क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणजे नक्की काय ?गावामधून क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यात  क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान हे अभियान आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये १ हजार लोकसंख्येच्या प्रमाणात १ क्षयरोग रुग्ण किंवा त्यापेक्षा कमी म्हणजेच अजिबात रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत