शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी दिला बारावीचा पहिला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:52 IST

बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला.

ठळक मुद्देरत्नागिरीत बारावीच्या परीक्षेला शांततेत प्रारंभसर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त

रत्नागिरी : बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला.कोकण परीक्षा मंडळाने परीक्षेसाठी जिल्ह्यात ३७ परीक्षा केंद्र व १२ परिरक्षक कार्यालये नियुक्त केली आहेत. परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्थेचे नियोजन केले असून, बैठक क्रमांक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळीच गर्दी केली होती. पालक व विद्यार्थी सकाळी ९.३० वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पेन, पॅड, हॉलतिकीट, पट्टी इतक्याच शैक्षणिक साहित्यासह प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोबत आणलेली सॅक बॅग परीक्षा केंद्रापासून दूरवर ठेवण्यात आल्याने ढिगारा जमला होता.बारावी परीक्षेसाठी विज्ञान शाखेतून ३ हजार १३४ मुलगे, तर २ हजार ५२८ मुली, वाणिज्य शाखेतून ४ हजार ५०१ मुलगे, तर ४ हजार ७१५ मुली, कला शाखेतून ३ हजार ४५२ मुलगे, तर २ हजार ९३१ मुली, एमसीव्हीसी शाखेतून ३८० मुलगे, तर २४० मुली परीक्षेला बसली आहेत.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात अर्धा तास आधी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आल्यामुळे विद्यार्थीवर्ग वेळेवर उपस्थित होता. यावर्षीपासून केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकांकडे सीलबंद पेपरची पाकिटे परीक्षेपूर्वी दिली. प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या हस्ते फोडण्यात आले.

पेपर फुटी व कॉपीसारख्या गैरमार्गाना आळा घालण्यासाठी बोर्डाने यावर्षीपासून या नवीन पध्दतीचा आवलंब केला आहे. कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी बोर्डातर्फे १२ भरारी पथके तयार केली आहेत. मोबाईलसाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर पालकवर्ग पाल्यांना घेण्यासाठी हजर होता. केंद्र असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांच्या वेळापत्रकामध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाStudentविद्यार्थी