शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरी 

By संदीप बांद्रे | Updated: February 15, 2024 16:03 IST

गावात गोंधळाच्या कार्यक्रम दाखविण्याचा बहाणा करत नेले अन् बळजबरीने अत्याचार केला

चिपळूण : मुंबईहून गावी पाहुणे आलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ मे २०१८ मध्ये घडली होती. या प्रकरणी गुहागर तालुक्यातील उमराठ गोरिवलेवाडी येथील अजित देवजी गोरिवले (४०) यास २० वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी गुरूवारी सुनावली. मुंबईवरून गावी पाहुणी म्हणून आलेल्या व स्वतःच्या मुलीप्रमाणे असलेल्या १५ वर्षांच्या शाळकरी मुलीला आरोपी अजित देवजी गोरीवले याने गावात गोंधळाच्या कार्यक्रम दाखविण्याचा बहाणा करत नेले. त्यानंतर तिला मोटारसायकल वरून मौजे उमराठ येथील नवलाई मंदीराच्या पाठीमागील बाजूस नेवून बळजबरीने बलात्कार केला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण केले. बलात्काराच्या घटनेने घाबरलेल्या मुलीने शेवटी घडेलला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानुसार पिडीत मुलीच्या आईने गुहागर पोलीस स्थानकात अजित गोरिवले याच्या विरूध्द रितसर तक्रार दिली होती. या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक समीर शेंडे यांनी सखोल चौकशी करीत अजित गोरिवले याच्या विरूद्ध भा. द. वि. कलम ३७६, ३२३, ५०६ अन्वये, तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाचे कलम ४, ६, ८, १० अन्वये, गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर याबाबत चिपळूण येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांचेपुढे पुर्ण झाली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी ९ साक्षीदार तपासले. आरोपीने बचावासाठी १ साक्षीदार तपासला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी १५ रोजी या खटल्याचा निकाल जाहीर केला. आरोपी अजित देवजी गोरिवले यास भारतीय दंड सहिंता कलम ३७६ (३), ३२३, ५०६ अन्वये तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ६ अन्वये दोषी ठरवून भा. द. वि कलम ३७६ (३) व पोक्सो ४ व ६ प्रमाणे आरोपीस २० वर्षे सक्तमजूरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा १ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा देण्यात येईल, असा आदेश दिला आहे. तसेच नुकसान भरपाईची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेशही न्यायालयाने केला आहे.  

याबाबत आरोपीला दिलेल्या शिक्षेमुळे महिला व शाळकरी मुलींवर वाढलेल्या लैंगिक अत्याचार सारख्या घटनांना आळा बसेल, तसेच या शिक्षेमुळे पिडीतेला व तिच्या कुटूंबियांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी दिली. या खटल्यामध्ये ठाकूर यांना कोर्ट पैरवी प्रदीप भंडारी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी