रत्नागिरी जिल्ह्यात २ अपघातात २ ठार
By Admin | Updated: June 1, 2014 00:45 IST2014-06-01T00:44:42+5:302014-06-01T00:45:05+5:30
संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील दुर्घटना

रत्नागिरी जिल्ह्यात २ अपघातात २ ठार
संगमेश्वर/रत्नागिरी : शुक्रवारपाठोपाठ आज शनिवारीही मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच होती. आज रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन ठार १४जण जखमी झाले. एक अपघात पालीनजीक कापडगावजवळ झाला. त्यात ट्रकवर मिनी लक्झरी आदळून एकजण ठार झाला. दुसर्या अपघातात गोळवशी टप्पा (संगमेश्वर) येथे टाटा सुमो उलटल्याने एकजण ठार झाले. या दोन्ही अपघातांमध्ये एकूण १४ जण जखमी आहेत. त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिला अपघात संगमेश्वरजवळील गोळवशी टप्पा येथील हॉटल मुकुंद कृपाजवळ पहाटे ५.४५ वाजता झाला. भांडूप मुंबई येथून कणकवलीला मानव अधिकार पदाधिकार्यांना घेऊन चाललेली टाटासुमो (एमएच-0३/एएफ८३६७) रस्त्याच्या कडेला गटारात पडली. त्यात एक ठार व ९ जण जखमी झाले. अरूण संभाजी जगताप (५०, रा. भांडुप) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या अपघातातील अन्य जखमी सुरेश बाबूराव मोरे, (५०, भांडुप, चालक), अभिमन्यू नामदेव घुगरे (५८ भांडुप), सुधीर जगन्नाथ कदम (भांडुप), प्रभाकर शंकरराव सोमकुवर (४९, जोगेश्वरी, मुंंबई), किशोर पांडुरंग तळेकर (४६, कल्याण), मोहन यशवंत कांबळी, दत्तात्रय रामनाथ म्हात्रे (२८), विजय लोंढे (अंधेरी) दीपक मोरे या सर्व जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या संगमेश्वर येथील रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरा अपघात पालीनजीक कापडगाव येथील सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झाला. ट्रकवर एक मिनी लक्झरी आदळली. ट्रक (एएच-0६ एसी ४६८५) गोव्याकडून मुंबईला तर लक्झरी (एमएच-0४/एफके २५०३) मैत्री पार्क, चेंबूर येथून गोव्याकडे जात होती. एका वळणावर वेग नियंत्रणात न राहिल्याने लक्झरी ट्रकवर आदळली. त्यात ट्रकचालक अरूण मंगर रजक (३३, रा. असूरांद, झारखंड) हा जागीच ठार झाला. लक्झरीचा चालक नितेश शांताराम लोंढे (३३, कलेक्टर कॉलनी, चेंबूर) केबीनमध्ये अडकला. त्याला लोकांनी क्रेन आणून बाहेर काढले. तो गंभीर जखमी आहे. सुहास चंद्रकांत गुरव (३६, चेंबूर), तुषार तुकाराम खवळे (३६, चेंबूर, दुसरा चालक), संतोष पांडुरंग अडाल (३३, गाडीचा मालक) हे या अपघातात जखमी झाले असून, त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या हातखबा येथील रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक व्ही. के. शिंदे, उपनिरीक्षक देशमुख, पाली क्षेत्राचे आर. डी. चव्हाण, प्रकाश कदम, यादव, रेवणे हातखबा वाहतूक शाखेचे विजय यादव दाखल झाले होते. अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी अमोल सावंत, मिलिंंद बेंडके, उदय नागले, संजोग वेतोस्कर, उमेश नागले, गोट्या शिंंदे, श्याम जाधव, दत्ता कोरे, विशाल साळुंखे, सुनील चव्हाण आदी तरुणांनी प्रयत्न केले. अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त लक्झरीचा समोरून चक्काचूर झाला आहे. (प्रतिनिधी)