शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:57 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातचिरेखाणीवर कामासाठी येणाऱ्या अन्य राज्यातील कामगाारांचा समावेश

रत्नागिरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे.बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीई २००९ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकही मूल शालाबाह्य राहणार नाही, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग कार्यरत आहे. स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शालाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट झाले आहेत. जिल्ह्यात चिरेखाणीवर कामासाठी येणाऱ्या अन्य राज्यातील कामगाारांचा समावेश आहे. याशिवाय रस्त्याच्या कामासाठी देखील अन्य राज्यातील मंडळी येत असल्यामुळे शैक्षणिक प्रवाहात परराज्यातून आलेल्या कामगारांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी शिक्षण विभागाला यश आले आहे. सन २०१६-१७ मध्ये १५९, सन २०१७-१८ मध्ये ६६, तर सन २०१८-१९ मध्ये ७४ मुले शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट झाली आहेत.रत्नागिरीमध्ये १३३५ शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, स्वअध्ययनावर भर, कठीण विषयाची आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करणे, शाळा सुंदर, बोलक्या करणे, शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना बालरक्षक म्हणून कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालाबाह्य मुलांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शालाबाह्य मुलांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करून त्यांचे युङ्कआयडी आधार काढण्यात यावेत, त्यांची उपस्थिती या माध्यमातून संनियंत्रित करण्यात यावी.या मुलांना वाचनङ्कलेखन व गणितातील मूलभूत क्रिया अवगत होण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने विकसित केलेल्या शैक्षणिक कृती आराखड्याचाच उपयोग करण्यात यावा. यासाठी शिक्षकांनी स्वत:ला अधिक समृद्ध करावे, अशा सूचना देण्यात आल्या असून, त्याची अमंलबजावणी सुरू आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीRatnagiriरत्नागिरी