शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रत्नागिरी जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी १९४८ अर्ज, ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 17:19 IST

महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत.

ठळक मुद्देअद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत. जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी भरले आॅनलाईन अर्ज

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. या योजनेंतर्गत सन २००१ ते २००९ अखेर कर्जमाफी घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत.सलग चार वर्षे (२०१२ ते २०१६) अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे ते नव्याने कर्ज घेऊ शकलेले नाहीत. राज्य शासनाने २०१७मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली.

या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखावरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार असतील त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ६१ हजार ४४१ शेतकरी आहेत.

त्यातील ४७ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केल्याने ते कर्जमाफीसाठी पात्र झाले होते. पात्र शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली. राज्य शासनाकडून केलेल्या छाननीत जून २०१८पर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ६७ कोटी ३४ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अद्याप १२ हजार ६१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.सन २००१ ते २००९ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु, त्या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचे लाभार्थी झाले नाहीत, अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १,९४८ आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून सादर करण्यात आले आहेत.

शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ ग्रीनलीस्ट देण्यात आल्या. काही कर्जदारांचा समावेश यलो लीस्टमध्ये करण्यात आला. जुन्या यादीप्रमाणे १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून, त्यांचा कोणत्या यादीत समावेश करणार, हे स्पष्ट झालेले नाही.

राज्य शासनाकडून आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत दोनवेळा वाढवली होती. त्याचवेळी २००१ ते २००९ या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला होता. त्यामुळे १५ जूनपर्यंत नव्याने आॅनलाईन माहिती भरण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी