हरपुडे येथे १८ जिवंत गावठी बाॅम्ब हस्तगत, तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:18+5:302021-09-03T04:33:18+5:30

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथील एका तरूणाच्या घरात अठरा जिवंत गावठी बाॅम्ब सापडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. ...

18 live village bombs seized in Harpude, youth arrested | हरपुडे येथे १८ जिवंत गावठी बाॅम्ब हस्तगत, तरुणाला अटक

हरपुडे येथे १८ जिवंत गावठी बाॅम्ब हस्तगत, तरुणाला अटक

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथील एका तरूणाच्या घरात अठरा जिवंत गावठी बाॅम्ब सापडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. याप्रकरणी हरपुडे मराठवाडीतील सुरेश आत्माराम किर्वे (४८) याला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत देवरूख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश किर्वे या तरूणाच्या घरात जिवंत गावठी बाॅम्ब असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानंतर दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोध व नाशक या पथकांनी बुधवारी हरपुडे येथे जाऊन सुरेश किर्वे याच्या घरातून ९ हजार रूपये किमतीचे तब्बल १८ जिवंत गावठी बाॅम्ब हस्तगत केले. जिवंत गावठी बॉम्ब बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवून मानवी जीविताला तसेच प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण केला म्हणून सुरेश किर्वे याच्याविरोधात बुधवारी रात्री ११ वाजता भारताचा बारी अधिनियम १९०८चे कलम पाच, भारतीय दंड विधान कलम २८६ अन्वये देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद रत्नागिरी येथील दहशतवादविरोधी पथकाचे हेडकाॅन्स्टेबल आशिष शेलार यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करत आहेत.

020921\img-20210902-wa0068.jpg

पोलिसांनी समवेत संशयित आरोपी

Web Title: 18 live village bombs seized in Harpude, youth arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.