जिल्ह्यात १७३ नवे रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:37+5:302021-08-14T04:37:37+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार १७३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले; तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १८८ बाधित ...

जिल्ह्यात १७३ नवे रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार १७३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले; तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १८८ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १,७६६ सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात दिवसभरात ५ आणि मागील दिवसात आणखी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चिपळूण तालुक्यातील ३ रुग्ण, खेड, रत्नागिरीत प्रत्येकी २ रुग्ण आणि दापोली, गुहागर, राजापूर या तालुक्यांमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण २,१८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण २.९६ टक्के आहे. मागील आठवड्यामध्ये बाधितांच्या मृत्यूचा दर ३.१५ टक्के होता.
जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यात ४ रुग्ण, दापोलीत ९ रुग्ण, खेडमध्ये २२, गुहागरात १६, चिपळुणात ३७, संगमेश्वरात २७, रत्नागिरीत २४, लांजात १४ आणि राजापुरात २० रुग्ण सापडले. यात आरटीपीसीआर चाचणीतील १११ रुग्ण, तर ॲन्टिजन चाचणीतील ६२ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्या ७३,८४३ झाली आहे. लक्षणे नसलेले १,२४१, तर लक्षणे असलेले ३४६ रुग्ण आहेत. जिल्ह्यात १,७६६ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ६९,८९१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९४.६५ टक्के आहे.