शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना नुकसानापोटी १५ लाख मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:46 IST

मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा बागायतदारांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले

रत्नागिरी : राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानापाेटी शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीला मान्यता दिली आहे. त्यानुसार एप्रिल, मे महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील १८३ आंबा बागायतदारांच्या एकूण ४०.०१ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानापाेटी शासनाकडून १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. याची झळ बागायतदारांना बसत आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील ४७३.६९ हेक्टर क्षेत्र बाधित हाेऊन १३,६०७ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्चमध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे त्या कालावधीत नुकसान झालेले नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा बागायतदारांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानापाेटी जिल्ह्यात नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना शासनाकडून १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची ही रक्कम जमा केली जाणार आहे.

  • कृषी विभागातर्फे एप्रिल व मे महिन्यातील नुकसानग्रस्त भागाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. एप्रिलमध्ये राजापूर तालुक्यातील ३० आंबा बागायतदारांचे १३.३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या नुकसानापाेटी ३ लाख ४ हजार रुपये इतक्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती.
  • मे महिन्यात जिल्ह्यातील १५३ आंबा बागायतदारांचे २६.६६ हेक्टर क्षेत्र बाधित हाेऊन ७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते.