खेडमध्ये सहा दिवसांत १४५ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:20+5:302021-07-10T04:22:20+5:30
खेड : तालुक्यात गेल्या सहा दिवसांत १४५ जणांना कोरोनाची बाधा झाली, तर दोन मृत्यू झाले. तालुका आरोग्य विभागाने ...

खेडमध्ये सहा दिवसांत १४५ कोरोनाबाधित
खेड : तालुक्यात गेल्या सहा दिवसांत १४५ जणांना कोरोनाची बाधा झाली, तर दोन मृत्यू झाले. तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, आणखी २० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तालुक्यातील बाधितांची संख्या ५,२६७ झाली आहे.
धामणंद परिसर, पीरलोटे, वेरळ-शिक्षक वसाहत येथे प्रत्येकी ३ रुग्ण भरणे ४, कुरवळ खेड २, पोसरे-कातकरवाडी २, कुरवळ जावळी, कळंबणी, ऐनवरे येथे प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडला. सद्य:स्थितीत २६३ रुग्ण सक्रिय आहेत. सीसीसी घरडा २९, खेड नगर परिषद कोविड सेंटर १७, शिवतेज आरोग्य सेवा संस्था ४५, कळंबणी ४०, डीसीएससी शिवतेज १९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४७८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बळींची संख्या २०१ झाली आहे. तालुक्यात ५२ ठिकाणी कंटेन्मेंट झोन कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरेगाव-गावडेवाडी येथे १८ रुग्ण आढळले असून, हा परिसर हॉटस्पॉट जाहीर केल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
--