शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील १३,१५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार, मच्छिमारांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:29 IST

कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसतानाच मत्स्यव्यसाय खात्यातील आर्थिक उलाढालीलाही चाप लागणार आहे.

ठळक मुद्देराज्याच्या आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे आदेश, रासुका खाली गुन्हा दाखल होणारया नौकांची यादी नेव्ही, कोस्ट गार्ड, पोलीसांना देणार

रत्नागिरी : कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसतानाच मत्स्यव्यसाय खात्यातील आर्थिक उलाढालीलाही चाप लागणार आहे.बेकायदेशीर मासेमारीविरोधात गेली कित्येक वर्षे लढा सुरु आहे. मात्र त्याला खात्यातूनच काही अधिकारी पाठबळ देत असल्याने आजपर्यंत अशी मासेमारी थांबली नव्हती. मात्र आता आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे या लढ्याला यश आल्याची चर्चा मच्छिमारांमध्ये सुरू झाली आहे.रिअल क्राफ्ट प्रणालीनुसार आतापर्यंतची नोंदणीकृत मासेमारी नौकांची संख्या २८ हजार ७६८ एवढी आहे. मात्र, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत १५ हजार ६१२ एवढ्याच नौकांनी मासेमारी करण्यासाठी परवाने घेतले आहेत. मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या नौका व प्रत्यक्षात मासेमारी परवाने घेतलेल्या नौकांमध्ये खूप मोठी तफावत आहे.

अशा नोंदणीकृत पण परवाना न घेतलेल्या नौकांपैकीच काही नौका बेकायदेशीर मासेमारी करतात. त्याची मत्स्य व्यवसाय खात्याने गंभीर दखल घेतली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या नौकांनी मासेमारी परवाना घेतला नसेल, अशा सर्व नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले आहेत.

ठाणे-पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना तत्काळ याबाबत अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.नोंदणी रद्द करण्यात आलेल्या नौकांची यादी नेव्ही, कोस्ट गार्ड व सागरी पोलिसांना देण्यात येणार आहे. नोंदणी रद्द झालेल्या नौका समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास त्यांच्या मालकांवर राष्ट्रीय सुरक्षा भंग केल्याबाबतंी तक्रार दाखल करण्यात यावी, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवरमासेमारी परवाना न घेतलेल्या नौका मालकांना अनेकदा संधी देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने आयुक्तांनी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या नौकांच्या अनुषंगाने काही गैरप्रकार झाल्यास, अनधिकृत मासेमारी झाल्यास किंवा सुरक्षतेबाबत अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्यावर राहणार असल्याची सक्त ताकीदही आयुक्तांनी दिली आहे.

राज्याच्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्याकडून झालेली नाही. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरामध्ये मासेमारी परवाना नसलेल्या मिनी पर्ससीननेट नौका आणि पर्ससीन नेट नौका निदर्शनास येऊनही त्यांच्या मालकांवर फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?- खलील वस्ता, मच्छिमार नेतेराजिवडा- रत्नागिरी.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरीkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग