शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरीत अनधिकृतपणे राहणाऱ्या १३ बांगलादेशींना शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:24 IST

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील चिरे खाणीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने ६ महिने कैद ...

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील चिरे खाणीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने ६ महिने कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्याय दंडाधिकारी निखिल गोसावी यांनी गुरुवारी ही शिक्षा ठोठावली.रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाला ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहंमद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमीर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अब्दुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नूरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली हे अनधिकृतपणे राहत असल्याचे आढळले हाेते.

त्यांच्यावर पूर्णगड पोलिस स्थानकात पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्णगडचे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी करून दोषारोपपत्र सादर केले होते. याचप्रकरणी गुरुवारी न्यायालयात सुनावणी होऊन मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी शिक्षा सुनावली आहे.

सर्वांचे लवकरच प्रत्यार्पणरत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे या सर्व १३ दोषी बांगलादेशी आरोपींना लवकरच प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधित एजन्सीकडे पाठपुरावा करून त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBangladeshबांगलादेशCourtन्यायालय