शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

१२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन येत्या सोमवारपासून रत्नागिरीत

By मेहरून नाकाडे | Published: February 03, 2024 6:47 PM

रत्नागिरी : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे १२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सोमवार दि. ५ ते बुधवार ...

रत्नागिरी : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे १२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सोमवार दि. ५ ते बुधवार दि. ७ फेब्रुवारी या कालावधीत स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनासाठी महाराष्ट्रातून सात ते आठ हजार वारकरी रत्नागिरीत येणार आहेत.संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. माजी संमेलनाध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज ठाकूर बुवा (दैठणकर) यांच्याकडून संमेलन अध्यक्षपदाची सूत्रे ह.भ.प.माधवमहाराज शिवणीकर (भक्त पुंडलीक फड प्रमुख) स्विकारणार आहेत. यानंतर महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे श्री विठ्ठल पुरस्काराचे वितरण आयोजित केले आहे. वारकरी संप्रदायाचे फडकरी बांधवांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश पास मंजूर केल्याबद्दल पाच किलो चांदीची श्री विठ्ठलाची मूर्ती देवून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरून संप्रदायासाठी योगदानाबद्दल संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख श्रीमंत सरदार उर्जितसिंह राजे शितोळे (अंकलीकर) यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.  पंढरपूर येथील फडकरी दिंडीकरी संघटनेचे सचिव ह.भ.प मनोहरमहाराज आैटी यांना वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी जीवन गाैरव पुरस्कार देवून गाैरविण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ पाईक म्हणून वै.ह.भ.भ.प भानुदास महाराज ढवळीकर यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार ह.भ.प देविदास महाराज ढवळीकर स्विकारणार आहेत.दुपारी १ वाजता दिंडी, सायंकाळी ४ वाजता जगद् गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प बापूसाहेब महाराज देहूरकर यांचे किर्तन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता महिला भजनी मंडळातर्फे सामूदायिक हरिपाठ होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी