जिल्ह्यात २४ तासांत ११५ नवे रुग्ण; २९ जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:09+5:302021-09-02T05:08:09+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...

115 new patients in 24 hours in the district; 29 killed by corona | जिल्ह्यात २४ तासांत ११५ नवे रुग्ण; २९ जणांचा कोरोनाने मृत्यू

जिल्ह्यात २४ तासांत ११५ नवे रुग्ण; २९ जणांचा कोरोनाने मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७५ हजार ८६२ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यापैकी ७२ हजार ३६९ जण बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे तर आतापर्यंत २३४२ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. सध्या ११५५ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी-जास्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात ११५ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६८ तर २३८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अँटिजन चाचणीत १६०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४७ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

२४ तासांत २ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याआधीच्या २७ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यामुळे एकूण २९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद एकाच दिवशी करण्यात आली आहे. बरे झालेल्या ५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५.४१ टक्के इतकी आहे तर मृत्यूची टक्केवारी ३ टक्के इतकी झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ५० व त्यावरील जास्त वयोगटांतील मृत्यू झालेल्या १९६६ रुग्णांचा समावेश असून ८२५ सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालय तसेच केअर सेंटरमध्ये एकूण १०७४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी लक्षणे असलेले रुग्ण २६५ असून लक्षणे नसलेल्यांची संख्या ८०९ इतकी आहे. होम आयसोलेशनमध्ये ४७० रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 115 new patients in 24 hours in the district; 29 killed by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.