शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चिपळुणात व्हेल माशाची १० किलोची उलटी जप्त, चौघेजण ताब्यात; वनविभागाची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:15 IST

चिपळूण : व्हेल माशाच्या १० किलो वजनाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांवर वनविभागाने मंगळवारी कारवाई केली. शहरानजीकच्या वालोपे येथे मुंबई ...

चिपळूण : व्हेल माशाच्या १० किलो वजनाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांवर वनविभागाने मंगळवारी कारवाई केली. शहरानजीकच्या वालोपे येथे मुंबई गोवा महामार्गावर एच. पी. पेट्रोल पंपासमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. या चौघा संशयितांमध्ये एका व्यावसायिकासह बीएचएमएस डॉक्टरचाही समावेश आहे.या प्रकरणी प्रकाश तुकाराम इवलेकर (६०), दिलीप पांडुरंग पाटील (५०, दोघेही रा. वेळवी ता. दापोली), प्रवीण प्रभाकर जाधव (४७, रा. मंडणगड), अनिल रामचंद्र महाडीक (४७, रा. अडखळ ता. मंडणगड) या चौघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये कारवाई केली आहे.गतवर्षी सलग दोन वेळा व्हेल माशाच्या उलटी प्रकरणी कारवाई झाली होती. त्यानंतर आता सर्वात मोठी कारवाई वनविभागाने केली आहे. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार मागील काही दिवसांपासून ट्रॅप तयार करण्यात आला होता. वनविभागाने एका बनावट ग्राहकाद्वारे संबंधित संशयितांकडे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना संबंधितांकडे व्हेल माशाची उलटी असल्याची खात्री पटली. त्यानुसार वालोपे येथे सापळा रचून या चौघांवर धडक कारवाई करीत त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे १० किलोची उलटी जप्त केली.या घटनेत आणखी एका संशयिताचा समावेश असल्याची माहिती वनविभागाला मिळाली असून, त्याचाही शोध वनविभाग घेत आहे. संशयित म्हणून अटक केलेल्या चौघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.या घटनेत जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीसोबतच संबंधितांनी वापरलेल्या दोन दुचाकी वनविभागाने जप्त केल्या आहेत. संशयित आरोपींवर वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम रामानुजम, विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रं. शि. परदेशी, परिक्षेत्र वन अधिकारी फिरते पथक आर. आर. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्र. ग. पाटील, सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल एम. एम डबडे, एम. व्ही. पाटील, सा. स. सावंत, रा. द. खोत, एन. एस. गावडे, राहुल गुंठे, अशोक ढाकणे, राणबा बंबर्गेकर, सुरज जगताप, सुरज तेली, अरुण माळी, विशाल पाटील यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणforest departmentवनविभाग