निवृत्तिवेतनात १० टक्के वाढ
By Admin | Updated: July 6, 2014 23:55 IST2014-07-06T23:50:46+5:302014-07-06T23:55:06+5:30
निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना

निवृत्तिवेतनात १० टक्के वाढ
चिपळूण : शासनाने ८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना त्यांच्या मूळ निवृत्तिवेतनात १० टक्के वाढ दिली आह. केंद्र शासनाप्रमाणे वाढ द्यावी अशी संघटनेची मागणी होती. परंतु, राज्य शासनाकडून ८० वर्षांवरील वयाच्या निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना मूळ निवृत्तिवेतनाच्या १० टक्के वाढ मंजूर झाली असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सीताराम शिंदे यांनी दिली.
प्रशासकीय पातळीवर अशा निवृत्तिवेतनधारकांची उपलब्ध रेकॉर्डवरुन यादी करण्याचे काम सुरु आहे. कुटुंब निवृत्तिवेतनधारकांची जन्मतारीख उपलब्ध होत नाही, असे समजते. ज्या सेवानिवृत्तांना ८० वर्षे पूर्ण व त्यापुढील वयोगटातील निवृत्तिवेतनधारक, कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांनी त्वरित त्या त्या पंचायत समितीच्या अर्थ विभागाशी संपर्क साधून जन्मतारीख सादर करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शिंदे यांनी केले आहे. (वार्ताहर)