weekly horoscopes 21 april to 27 april 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 21 एप्रिल ते 27 एप्रिल 2019
आठवड्याचे राशीभविष्य - 21 एप्रिल ते 27 एप्रिल 2019

मेष 

 

आठवडयाच्या सुरुवातीस आपणास कामात काहीसा थकवा व कंटाळा जाणवेल. असे असले तरीही नियोजित कामे आपण टप्प्या टप्प्याने पूर्ण करू शकाल. आर्थिक बाबतीत आपणास अधिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. नोकरीत बोनस किंवा बक्षिसाच्या स्वरूपात लाभ होईल, तर व्यापारात नवीन ऑर्डर्स मिळू शकतील. कामात आपली व्यस्तता वाढल्याने कुटुंबास आपण पुरेसा वेळ देऊ शकणार नाही... आणखी वाचा

वृषभ

आठवडयात आपली मनः स्थिती दोलायमान होत असल्याचे आपणास जाणवेल. त्यामुळे समोरच्या व्यक्तीस आपल्या विषयी अंदाज बांधता येणार नाही व त्यामुळे कोणाशीही जुळवून घेणे आपणास अवघड होऊन बसेल. सुरुवातीस खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण जाणवेल. आठवडयाच्या मध्यास विशेषतः दि.२३ च्या संध्याकाळ नंतर ते दि. २५ च्या रात्री पर्यंत आपणास काही ना काही कारणाने काळजी वाटत राहील. कार्यालयात कामाचा ताण वाढेल. व्यवसायात अडचणी उदभवतील... आणखी वाचा

मिथुन 

आठवडयाच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंतची वेळ चांगली आहे मात्र त्या नंतर आपली प्रकृती काहीशी नरम गरमच राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभू शकेल. आपण अधिक उत्साहाने पुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न कराल व सहकाऱ्यांसह ठोस नियोजन करून सर्वाना प्रभावित करू शकाल. व्यवसायात सुद्धा आपली कुशाग्र बुद्धी व नवीन विचार ग्राहकांना आकर्षित करण्यास उपयोगी होऊ शकेल... आणखी वाचा

कर्क

कष्ट करण्यात आपण कमी पडत नाहीत, त्यामुळेच आजवर आपण घेतलेल्या परिश्रमाच्या फळाच्या स्वरूपात कार्यात यश आपली वाट पहात आहे. ह्यामुळे आपला आनंद व उत्साह द्विगुणित होईल. आठवडयाच्या सुरवातीस घर - कार्यालय, समाज किंवा कोणत्याही ठिकाणी आपण जेथे जाल तेथे आपल्या सिद्दीची व प्रगतीचीच चर्चा होईल व आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. नशिबाची साथ लाभेल... आणखी वाचा

सिंह 

आपणास प्रत्येक कामात यश लाभल्याने मन प्रफुल्लित होईल. आर्थिक आघाडीवर आपली प्रगती उत्तम होईल. मित्र व स्नेहीजनांची भेट घडल्याने घरातील वातावरण आनंदी व उत्साही होईल. आठवडयाची सुरवात अस्थिर मनाने होईल. मानसिक थकवा जाणवेल. नवीन कार्यास सुरवात करण्याची प्रेरणा होईल, परंतु विचारात स्थैर्य नसल्याने काही बाबतीत गोंधळ उडेल... आणखी वाचा

कन्या

आपण केलेल्या गुंवणूकीतून चांगल्यात चांगला परतावा आपणास मिळू शकेल. धनलाभ होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. भावंडांकडून लाभ होऊ शकेल. आपण आपली नियोजित कामे पूर्ण करू शकणार नाहीत. परंतु धीराने आपली कामे करत राहावे. आपल्या कार्याचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आठवडयाच्या अखेरच्या दिवसात आपण भावंडे व मित्रांसह दिवस घालविण्यास पसंती द्याल... आणखी वाचा

तूळ 

आठवडयाच्या सुरुवातीस आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आनंदाचे वातावरण राहील. सुरुवातीच्या दिवसात आपले लक्ष अधिक प्रमाणात प्राप्तीत वाढ करण्यावर केंद्रित होईल, व त्यामुळे व्यावसायिक आघाडीवर आपली सक्रियता वाढेल. आर्थिक, शारीरिक किंवा सामाजिक दृष्टया आपण समाधानी राहाल. कामा निमित्त बाहेर जाण्याचे आयोजन कराल व आपला प्रवास फलद्रुप सुद्धा होईल... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवडयाच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत काही अंशी बेचैनी व प्रतिकूलतेस सामोरे गेल्यावर लगेचच शारीरिक व मानसिक प्रफुल्लता व ताजेपणा यांसह आपण नव्याने सुरुवात कराल. नवीन कार्याचा आरंभ करण्यासाठी आठवडयाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. सुरुवातीपासूनच आपल्यात जोम व उत्साह भरपूर असेल तसेच आत्मविश्वासाने व्यावसायिक आघाडीवर आपण पुढील वाटचाल कराल. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाची चर्चा होऊन त्यांच्या कृपेचा वर्षाव होण्याची सुद्धा शक्यता आहे... आणखी वाचा

धनु

आठवडयाच्या सुरुवातीस सर्वात महत्वाचे म्हणजे आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या आरोग्यासाठी पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. नकारात्मक विचार येऊन आपण चुकीच्या मार्गास लागणार नाहीत, ह्याची काळजी घेण्यास श्रीगणेशजी सांगत आहेत. पहिल्या दिवशी दुपार पर्यंत आपण शांततेत दिवस घालवू शकाल, मात्र त्या नंतर मानसिक अशांततेने आपण पछाडले जाल... आणखी वाचा

मकर

आठवडयाच्या सुरुवातीस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आपल्यावर विविध लाभांचा वर्षाव होईल. आठवडयाच्या सुरवातीस आपले लक्ष व्यावसायिक बाबींवर अधिक राहील. सध्या नवीन धाडस करण्यासाठी आपण मनात एखादी योजना आखाल, परंतु त्याची अंमल बजावणी करण्यासाठी थोडी वाट पाहिल्यास जास्त फायदा होईल. प्रेम प्रकरणात आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जेणे करून अनावश्यक संघर्ष टाळता येईल... आणखी वाचा

कुंभ 

सध्या आपण नवीन कार्यासाठी जे आयोजन केले आहे ते साकारण्यासाठी या आठवडयाचे सुरुवातीचे दिवस अतिशय अनुकूल असे आहेत. व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ होईल. वसुली होऊ शकेल. नोकरी करणार्यांना सुद्धा वरिष्ठांची शाबासकी मिळेल. पगारवाढ, बढती किंवा बढतीसह बदली होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांची ख़ुशी किंवा गरज ह्यासाठी आपण वाहन खरेदी कराल किंवा जुन्या वाहनाची दुरुस्ती करवून घ्याल... आणखी वाचा

मीन

आठवडयाची सुरुवात अंधारातून प्रकाशाकडे नेणारी असल्याचे आपणास जाणवेल. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत थोडी मानसिक अस्वस्थता व बेचैनी जाणवली तरी त्या नंतर स्थितीत सुधारणा होईल. आपल्या वैचारिक समृद्धीत वाढ होत असताना बौद्धिक प्रतिभा लाभदायी ठरू शकेल. व्यापार - व्यवसाय व नोकरीत प्रगती करण्यासाठी सक्रिय व्हाल. कामासाठी लागणारी वसुली किंवा कर्जा संबंधी कामे झपाटयाने होतील. कामात प्रगती करण्याची संधी लाभेल... आणखी वाचा

 


Web Title: weekly horoscopes 21 april to 27 april 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.