शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साप्ताहिक राशीभविष्य : ०६ मार्च ते १२ मार्च २०२२- चांगल्या बातम्या कळतील, धनलाभ होईल; कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 07:44 IST

सप्ताहाच्या प्रारंभी दि. ६ मार्च रोजी बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. अन्य कोणत्याही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी हर्षल मेष राशीत, राहू वृषभ राशीत, केतू वृश्चिक राशीत, मंगळ, शुक्र, शनी आणि प्लुटो मकर राशीत, रवी, गुरू, नेपच्यून आणि बुध कुंभ राशीत असतील.

सप्ताहाच्या प्रारंभी दि. ६ मार्च रोजी बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. अन्य कोणत्याही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी हर्षल मेष राशीत, राहू वृषभ राशीत, केतू वृश्चिक राशीत, मंगळ, शुक्र, शनी आणि प्लुटो मकर राशीत, रवी, गुरू, नेपच्यून आणि बुध कुंभ राशीत असतील. चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहिल, रविवार दि ६ मार्च २०२२ रोजी फाल्गुन शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी रात्री ९.१३ पर्यंत राहील. नक्षत्र दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ३.५१ पर्यंत अश्विनी तर त्यानंतर भरणी राहील. रास मेष असेल. दिवस चांगला आहे. विनायकी चतुर्थी आहे. राहू काळ सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत राहील. 

मेष- चांगल्या बातम्या कळतीलग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. सगळ्या अडचणी दूर होतील. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. उत्तम संधी चालून येतील. जर नोकरीत बदल करायचा असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. तयारी करण्यासाठी हरकत नाही. ओळखीचे फायदे होतील. मोठ्या पदावर असलेल्या परिचितांकडून सहकार्य मिळेल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

वृषभ- वाहने जपून चालवानोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मौजमजा करण्याकडे कल राहील. मात्र, प्रवासात काळजी घ्या. वाहने जपून चालवा. जीवसाथीच्या मनासारखे वागा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाण्याचे योग आहेत. आर्थिक आवक चांगली राहील. एकंदरित सामान्य परिस्थिती राहील. लेचेपेचे विचार करू नका. मनात काळजीचे विचार येऊ देऊ नका. त्यासाठी एखाद्या छंदात स्वत:ला गुंतवून घ्या. चांगल्या पुस्तकाचे वाचन करा. हितचिंतकांशी मन मोकळे करुन बोला. टीप- गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

मिथुन- चैनीवर खर्च करालसंमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक आवक चांगली राहील. अनाचक हाती पैसा येईल. मात्र, चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. तसेच एखाद्या कारणाने पैशाचा अपव्यय होऊ शकतो. काहींना भेटवस्तू मिळतील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. विशेष बदल होणार नाहीत. महत्वाचे काम पूर्वाधात उरकून घ्या. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. त्यांचे कौतुक होईल. काहींना उच्च शिक्षणासाठी चांगली संधी मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

कर्क- लगबग राहीलहा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. काही घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगबग राहील. व्यवसायात भरभराट होईल. मोठ्या सौद्यात फायदा होईल. नोकरीत असाल तर तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. अधिकार वाढवून मिळतील. नवीन संधी मिळतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. त्यासाठी खर्च कराल. मात्र पैसे खर्च झाले तरी मनासारखे काम झाल्याचे समाधान मिळेल. एखाद्या नवीन कार्यक्षेत्राशी ओळख होईल. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस. 

सिंह- मन प्रसन्न राहीलया आठवड्यात ग्रहमान अनुकूल राहील. मनासारख्या गोष्टी घडतील. विविध प्रकारचे लाभ होतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. चांगल्या बातम्या कळतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मनावरील ताण कमी होईल. आर्थिक आवक चांगली राहील. बचतीचे नियोजन नीट केले पाहिजे. नोकरीत थोडी दगदग होईल. घरातील कामे व नोकरी व्यवसायातील उलाढाली यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन आणि शिस्त गरजेची आहे. जीवनसाथीची साथ राहील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

कन्या- संयम सोडू नकासंमिश्र ग्रहमान आहे. आठवड्याची सुरुवात दगदगीची कामे करण्यात जाईल. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात सामानाची व कागदपत्रांची काळजी ग्या. वाहनाच्या वेगवर नियंत्रण ठेवा. वाहनाच्या दुरूस्तीकडे वेळीच लक्ष द्या. नोकरीत बदलची शक्यता आहे. आर्थिक आवक ठिकठाक राहील. काहींना अचानक लाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहा. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. टीप- गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

तूळ- धनलाभ होईलधनलाभाच्या दृष्टीने सप्ताह चांगली फळे देईल. विविध प्रकारचे धनलाभ होतील. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र गैरसमज होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. प्रवास होतील. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचे पासवर्ड, पिन अशी माहिती कुणाला कळणार नाही याची काळजी घ्या. ऑनलाइन व्यवहार जपून करा. वाहने जपून चालवा. चांगल्या संधी मिळतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

वृश्चिक- मानसन्मान मिळेलआपल्या धडपडीला या कालखंडात यश मिळेल. केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. नफ्याचे प्रमाण वाढते राहील. मानसन्मान मिळेल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीत तुमच्याकडे अपेक्षेने पाहिले जाईळ. घरातील सदस्यांशी संवाद राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. महत्वाची कामे करताना अडचणी येतील. मुत्सद्दीपणाने वागा. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस. 

धनू- सर्वांचे सहकार्य मिळेलधनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. घर, शेतीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे सौदे ठरतील. घरात आनंदी वातावरण राहील. काही घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. भावंडांशी चांगले संबंध राहतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत प्रगती होईल. आपणदेखील सकारात्मक दृष्टीकोन ठेवून इतरांचे विचार ऐकून घेतले पाहिजेत. टीप- रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस. 

मकर- यश मिळेलयशदायक काळ आहे. व्यवसायात असाल तर संधी मिळतील. मालाची विक्री चांगली होईल. हाती मनासारखा पैसा येईल. हाती घेतलेल्या प्रकल्पात फायदा होईल. नवीन ओळखी होतील. ओळखीतून फायदे होतील. एखादे मोठे काम पूर्ण होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. घरात किरकोळ कारणावरुन कुरबुर होईल. मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्या. त्यांची काळजी घ्या. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. आहाराचे तंत्र सांभाळा. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस. 

कुंभ- मोहात अडकू नका. या सप्ताहात खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. मात्र कुणी तुम्हाला मोहात अडकविण्याचा प्रयत्न करील. थोडो सावध राहा. योग्य मित्रांच्या संगतीत राहा. जीवनसाथीच्या मताचा आदर करा. भावंडांशी गैरसमज दूर होतील. चूक आपलीच राहील. अहंभाव सोडून दिला की सगळे सुरळीत होते हे लक्षात घ्या. व्यवसायात विक्री चांगली होईल. घरी पाहुणे येतील मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस. 

मीन- विविध फायदे होतील. तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल, ग्रहमान अनुकूल राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. अचानक धनलाभ होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. कागदपत्रे वाचून सही करा. एखाद्या स्त्रीकडून लाभ, फायदे, मार्गदर्शन मिळेल. कायदेशीर कामे पूर्ण होतील. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होतील. घरी पाहुणे येतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष