शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

आठवड्याचे राशीभविष्य - 29 डिसेंबर 2019 ते 4 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 08:28 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवड्याच्या पूर्वार्धात प्रिय व्यक्तीच्या जवळीकीने आपण आनंदित व्हाल. एखाद्या व्यक्तीशी भावनिक नात्याने जोडले जाल. नोकरी करणाऱ्यांना बढती सदृश्य बातमी मिळेल. सामाजिक पत - प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या निमित्ताने किंवा मनोरंजनासाठी एखाद्या छोट्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. कौटुंबिक व व्यावसायिक आघाडीवर दिवस आनंदात घालवू शकाल. दोन्ही आघाड्यांवर आपण महत्वाचे मुद्दे हाती घ्याल. आपण सामाजिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक स्नेहसंमेलनात अथवा शुभ कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा 

वृषभ

मागील आठवडा प्रतिकूल परिस्थितीचा होता तर ह्या आठवड्याची सुरवात सकारात्मक स्थितीने होईल. विवाहितांना वैवाहिक जीवनात उत्कट प्रेमाची अनुभूती येईल. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील व त्यांच्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल असला तरी भावी कारकिर्दीची निवड करताना आपल्या मनाचा असमंजसपणा दिसून येईल. अशा परिस्थितीत तज्ञ मंडळींशी चर्चा करून निर्णय घ्यावा. अखेरच्या दिवशी नव्या कामाची सुरुवात न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

मिथुन

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास थोडी बेचैनी जाणवेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्याच बरोबर पोटदुखी व सांधे दुखीचा सुद्धा आपणास त्रास होईल. अचानकपणे खर्च उदभवल्याने आपल्या खिशावर ताण पडेल. प्रेमीजनां दरम्यान काही वाद - विवाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रतिकूल वातावरणात सुद्धा आपण खंत बाळगून काम केल्यास प्रगती करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना पहिला दिवस वगळता संपूर्ण आठवडा विद्याभ्यासात यशस्वी होण्याचा आहे... आणखी वाचा

कर्क 

आजवर व्यापार - व्यवसायाकडे लक्ष दिल्या नंतर आता विश्रांती घेण्याची आपली इच्छा होईल. कुटुंबियांसह छोटा प्रवास करू शकाल. अविवाहितांना प्रिय व्यक्तीसह बाहेर जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकंदरीत चांगला आहे, परंतु आठवड्याच्या मध्यास सामान्य अभ्यासा ऐवजी परा विज्ञानाचा अधिक खोलवर अभ्यास करण्यास आपण उत्सुक व्हाल. आठवड्याच्या मध्यास प्रेमीजनांत वाद - विवाद होऊन अबोला होईल, परंतु पूर्वार्ध व उत्तरार्ध अनुकूल असल्याने संबंधांचे सौख्य चांगले मिळू शकेल... आणखी वाचा

सिंह

आठवड्याच्या सुरवातीस रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याचे व बाहेर फिरावयास जाण्याचे आयोजन होऊ शकेल. मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. वैवाहिक जीवनातील जवळीक वाढेल. अविवाहित व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्ती समक्ष आपल्या मनातील गोष्ट सांगू शकतील, परंतु सध्या संबंधात जपून राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. घरातील सामानात फेरबदल किंवा घर सजावटीसाठी काही सामान किंवा नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात आपणास मानसिक व्याकुळता जाणवेल... आणखी वाचा

कन्या

आठवड्याच्या सुरुवातीस आपण सर्व कार्ये सहजपणे पार पाडू शकाल. आपल्या कौटुंबिक वातावरणात शांतता नांदल्याने मनास थोडे हलके वाटेल. धार्मिक वाचन किंवा सत्संगामुळे आपणास अनोखा आनंद मिळेल. कुटुंबातील स्त्रियांशी कोणत्याही कारणाने कटुता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी आपण अधिक स्पष्टता दाखविणे उत्तम राहील. आठवड्याच्या मध्यास विशेषतः दि. ३० च्या दुपार पासून ते १ च्या संध्याकाळ पर्यंत शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. छातीत दुखणे किंवा इतर विकारांचा त्रास होईल... आणखी वाचा

तूळ

आठवड्यात घर व कार्यालय ह्यात समतोल साधावा लागेल. सुरवातीस आपण कुटुंबास प्राधान्य द्याल व विशेषतः कुटुंबियांच्या सौख्यासाठी सढळ हस्ते खर्च कराल. सामान्यपणे आपण स्वतःचे कामच कराल व इतरांच्या व्यक्तिगत बाबींमध्ये स्वारस्य दाखवणार नाही. आठवड्याच्या मध्यास प्रेम संबंधात अनुकूलता असल्याचे दिसून येईल व आपल्यात भेटीगाठी होण्याची सुद्धा शक्यता वाढेल. कुटुंबियांसह कामात सुद्धा आपण लक्ष घालू शकाल व विशेषतः उत्तरार्धात कारकिर्दीतील प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल... आणखी वाचा 

वृश्चिक

आठवड्याच्या सुरवातीस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात वेळ घालवाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी ठरेल. सध्या आपण ध्येय सिद्धीसाठी प्रयत्नशील राहाल. न्यायी वृत्ती राहिल्याने आपण स्वतः बरोबर इतरांचा सुद्धा विचार कराल. वैवाहिक जोडीदार किंवा प्रियव्यक्ती बरोबर असताना रागावर नियंत्रण ठेवा. व्यापाऱ्यांनी भागीदारांशी धीराने वागावे. आपल्या घाईमुळे कदाचित संबंधात ताण निर्माण होऊ शकतो. संततीशी सलोखा राहील. नोकरी करणाऱ्यांना शेवटच्या दिवशी एखादी चांगली संधी मिळू शकेल... आणखी वाचा

धनु 

आठवड्यात आपले प्रणयी जीवन चांगले राहिले तरी ते टिकविण्यासाठी आपणास काही तडजोड करावी लागेल व परस्पर विश्वास सुद्धा ठेवावा लागेल. आर्थिक लाभ संभवतो. नकारात्मक विचाराने आपले मन ग्रासित राहू नये म्हणून आपल्या आवडत्या प्रवृत्तीत सहभागी व्हावे. शारीरिक स्फूर्तीची उणीव भासेल. घरातील विसंवादी वातावरण टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीशी विनम्रतेने वागावे. जमीन, घर, वाहन इत्यादींचे दस्तावेज जपून ठेवावेत. उत्तरार्धात जलाशया पासून दूर राहावे. कफ व सर्दीचा त्रास संभवतो. शेवटच्या दिवशी सर्जनात्मक प्रवृत्तीत विशेष स्वारस्य दाखवाल... आणखी वाचा

मकर 

कायदेशीर बाबींमध्ये जपून पाऊल उचलावे. भावनाशील होऊन एखादे चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. वाणी व वागणुकीत सौम्यता नसल्यास अनर्थ घडण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. आपला आत्मविश्वास वाढेल व त्यामुळे आपण कामाच्या बाबतीत त्वरित निर्णय घेऊन प्रगती साधाल. आपल्या पत - प्रतिष्ठेत वाढ होईल. असे असले तरी तापट स्वभाव व अहं ह्यामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वडील किंवा वडीलधाऱ्यांची अधिक काळजी घ्यावी लागेल... आणखी वाचा

कुंभ

कुटुंबियांशी कटुता टाळावी. प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. वाद - विवाद व गैरसमज टाळावे. डोकेदुखी, पोटाचे विकार ह्यांचा त्रास संभवतो. त्या नंतर आपण कोणत्याही कामात आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडिलधाऱ्यांचे सहकार्य मिळवू शकाल. सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी होईल. दांपत्य जीवनात सलोखा राहील. दूरवर राहणारे स्नेहीजन व मित्रांचा संपर्क लाभदायी ठरेल. कुटुंबात सुख - शांती नांदेल. रुचकर भोजन प्राप्ती होईल. सध्या आपणास चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते... आणखी वाचा

मीन 

व्यावसायिक आघाडीवर शक्यतो कोर्ट - कचेरीच्या किंवा सरकारी कामाच्या बाबतीत इतरांना डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आपणास कामात मुळा पासून बदल करण्याचे विचार येण्याची शक्यता असून कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा. सुरवातीस आर्थिक लाभाची अपेक्षा आपण बाळगू शकाल. व्यावसायिक आघाडीकडे सुद्धा आपण लक्ष द्याल, परंतु दि. ३० च्या दुपार पासून ते १ च्या संध्याकाळ पर्यंत मनातील उद्वेग व काळजीमुळे आपले आरोग्य सुद्धा बिघडेल. असंयमित वाणी व वागणुकीमुळे एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष