शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

आठवड्याचे राशीभविष्य - 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 09:46 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. ह्या दरम्यान आपली संपूर्ण दिनचर्या विस्कळीत होईल. नवीन प्रकल्प हाती घेऊन त्यात आपण यशस्वी सुद्धा व्हाल. मोठ्या लोकांचे सहकार्य मिळेल. आपण कोणताही निर्णय घेण्यात विलंब होऊ न दिल्याने त्याचा अनुकूल परिणाम आपणास मिळू शकेल. जर सुरवातीपासूनच दृढ निश्चयाने वाटचाल केलीत तर निश्चितच यश प्राप्त होईल. डोक्यात नव - नवीन विचार घोळत राहतील. आपण इतर प्रवृत्तीत सुद्धा गढून जाल. विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी जास्त मेहनत करावी लागेल... आणखी वाचा

वृषभ 

आठवडा आपणास अत्यंत अनुकूल आहे. कष्टाचे यथोचित फळ न मिळून सुद्धा आपण हिंमतीने पुढील वाटचाल करू शकाल. दीर्घकालीन गुंतवणूक करू शकाल. नियोजनानुसार कामे होऊन प्रलंबित कामे सुद्धा पूर्णत्वास जातील. आर्थिक लाभ सुद्धा संभवतो. कार्यालय किंवा व्यवसायातील कामाच्या ताणामुळे थकवा व मानसिक बेचैनी जाणवेल. ह्या दरम्यान कोणतेही नवीन काम करू नका. आपल्या पराक्रमात वाढ होईल. आपण जर आपल्या शक्तीचा योग्य वापर केलात तर अद्भुत परिणाम मिळवू शकाल. आपल्या एखाद्या लहानशा चुकीचे परिणाम गंभीर होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मिथुन

पित्त विकार, सांधेदुखी इत्यादींचा त्रास संभवतो. जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. व्यापार - व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होईल. नियोजनानुसार कामे पूर्ण कराल. अपूर्ण राहिलेली कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. कार्यालयातील सहकारी आपणास कामात मदत करतील. मातुल पक्षातील एखाद्या व्यक्तीचा सहवास घडेल. कुटुंबियांसह एखाद्या सामाजिक प्रसंगास किंवा सहलीस जाऊन दिवस हसत - खेळत घालवाल. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धी करता येईल. व्यवसाय विस्ताराची योजना तयार करावी. व्यावसायिक योजनेत इतरांना समाविष्ट कराल... आणखी वाचा

कर्क

चिंतातुर राहिल्याने आपल्या अभ्यासात एकाग्रतेचा अभाव असल्याचे दिसून येईल. पोटाच्या विकाराने त्रस्त व्हाल. जुन्या आजारा पासून सुटका होईल. नोकरीत आपल्या कामगिरीने वरिष्ठांना प्रभावित करू शकाल. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढल्याची जाणीव होईल. दांपत्य सौख्य उपभोगू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. कुटुंबियांसह सामाजिक समारंभ, लग्न समारंभ किंवा बाहेर फिरावयास जाऊन आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक प्रसन्नता जाणवेल. सार्वजनिक जीवनात यश - कीर्ती लाभ होईल... आणखी वाचा

सिंह

कामात विलंबाने मिळालेल्या यशामुळे व प्रकृती अस्वास्थ्यामुळे नैराश्य जाणवेल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामात लक्ष लागणार नाही. वेळेवर कामे पूर्ण न झाल्याने आपल्या बेचैनीत भर पडेल. कामाच्या भरपूर व्यापाने थकवा जाणवेल. व्यापारासाठी आपण नवीन कल्पना मांडाल. कर्मचाऱ्यांशी सलोखा राहील. कंटाळा व आळसामुळे निर्धारित कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. प्रतिस्पर्ध्यांशी वाद घालू नका. अपघात किंवा दुखापत होण्याची शक्यता असल्याने वाहन जपून चालवा. विद्यार्थ्यांना आराम जाणवेल. आर्थिक प्राप्तीचे स्रोत वाढल्याने आपली स्थिती सुदृढ होईल... आणखी वाचा

कन्या

आपल्या मित्र मंडळात अशा नवीन मित्रांची भर पडेल कि जी भविष्यात लाभदायी ठरू शकेल. आर्थिक व व्यावसायिक लाभ होतील. सावध राहण्याची गरज आहे. निरनिरळ्या काळजींमुळे आपले आरोग्य बिघडेल. नेत्र विकार संभवतात. आपली कामे अपूर्ण राहतील. खर्चात वाढ होईल. कष्टाच्या मानाने यशाचे प्रमाण कमी असेल. अपघाताची शक्यता आहे. थकवा व आळस जाणवेल. आपली रचनात्मक व कलात्मक शक्ती बहरून येईल. अनिर्णयाक स्थितीमुळे महत्वाच्या कामात आपण अडकून जाल. कोणताही निर्णय घेता येणार नाही. ह्या आठवड्यात आपला हट्टीपणा वाढेल... आणखी वाचा

तूळ 

भावंडां दरम्यानचे संबंध अधिक दृढ होतील. विवाहित जातक सासुरवाडीच्या व्यक्तींच्या सहवासात येतील व त्यातून त्यांना काही लाभ सुद्धा होईल. अजीर्ण व वात विकार संभवतात. कुटुंबियांशी घनिष्ठता वाढेल. चिंतामुक्त झाल्याने मन खुश होईल. कल्पनाशक्ती उच्च असल्याने आपल्या मनात नवीन विचार घोळत राहतील. त्याचा नोकरी - व्यवसायात लाभच होईल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेऊ शकाल. अचानकपणे एखादा प्रवास करावा लागेल. पैश्याचे महत्व पटेल. हात सढळ असल्यास खर्चाचा तपशील नोंद करून ठेवा, अन्यथा महिन्याच्या अखेरीस आर्थिक नियोजन करताना अडचणी येतील... आणखी वाचा

वृश्चिक

भावंडे व नातेवाईकांशी आपला सलोखा राहील. नवीन कार्याचा प्रारंभ करू शकाल. आपण अधिक भावुक व्हाल. एखादा प्रवास संभवतो. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडे आपण लक्ष द्याल. प्रत्येक कामात आत्मविश्वास व मनोबलाने यश प्राप्त करू शकाल. पिता व पैतृक संपत्ती ह्यापासून लाभ होईल. शासनाशी केलेले आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील. विद्यार्थी उत्तम रित्या अभ्यास करू शकतील. अचानकपणे खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अडचणी येतील. अभ्यासा दरम्यान अनावश्यक वस्तुंना दूर ठेवा कारण त्यांनी नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते... आणखी वाचा

धनु 

वडिलांकडून आपणास लाभ होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी टिकून राहील. शासनाकडून लाभ होतील. प्रशासनाशी केलेले आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. संततीसाठी खर्च किंवा गुंतवणूक कराल. कलावंत व खेळाडू आपल्या उत्तम कामगिरीने इतरांना प्रभावित करू शकतील. आपल्या बोलण्याने एखादी व्यक्ती मंत्रमुग्ध होईल व त्यामुळे आपणास काही लाभ होईल. लेखन - वाचनाची गोडी वाढेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळून सुद्धा आपण पूर्ण जोमाने कामे कराल. हास्य - विनोदात वेळ घालवाल. आपली कामे नियोजनानुसार पूर्ण झाल्याने आर्थिक लाभ होईल... आणखी वाचा

मकर 

जर लाभ घ्यावयाचा असेल तर आपली संकल्प शक्ती बलवान करा. जीवनात काही मिळविण्यासाठी ध्येय पूर्ती करण्याच्या मागे लागा. ह्या आठवड्यात अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. कोणाला जामीन राहू नका. जीवनात काहीच सहजपणे मिळत नसल्याची जाणीव होईल. लाभापासून वंचित होत असल्याचे जाणवेल. ह्या दरम्यान आपण आपल्या लहान - सहान कामात सुद्धा इतरांना हस्तक्षेप करावयास लावाल असे दिसत आहे. आपणास जरी हे रुचले नाही तरी हि सध्या हि काळाची गरज आहे... आणखी वाचा

कुंभ

कुटुंबात पत्नी व संततीशी सलोखा राहील. मित्रांचा सहवास आनंददायी ठरेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. शारीरिक कष्ट, नेत्र विकार इत्यादी होण्याची शक्यता आहे. व्यवहारात आपण बेफिकीर राहण्या ऐवजी शांतता व गंभीरतेचा विचार करावा. आपल्या बोलण्यामुळे किंवा कृतीमुळे आपले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता असल्याने रस्त्यावर वाहन अती वेगात चालवू नका. चिंताग्रस्त राहाल. प्रकृती सुद्धा साथ देणार नाही. कुटुंबीय व संततीशी आरामात वेळ घालवाल... आणखी वाचा 

मीन

अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. स्त्री मित्रांपासून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनाचे सुख उपभोगू शकाल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांपासून लाभ होईल. नवीन मैत्री होईल, जी भविष्यात लाभदायी ठरेल. अपेक्षित लाभ होतील. शेअर्स - सट्ट्या सदृश्य प्रवृत्तीतून काही काळ लाभ होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावे लागतील. शासन किंवा सत्ताधाऱ्यांशी संबंध सुधरून लाभ होतील. थोडे सावध राहण्याची गरज आहे. विनाकारण सल्ले देऊ नका, अन्यथा आपणास त्रास होईल. कोणाला जामीन न राहण्याचा किंवा आर्थिक देवाण - घेवाण न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष