शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 11:20 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

हा आठवडा मिश्र फलदायी आहे. सुरुवात चांगली होईल. सुरुवातीचे दोन दिवस आपली आर्थिक कामे करण्यासाठी अनुकूल आहेत. अनेक दिवसांपासून खोळंबलेली सरकारी व कायदाकीय कार्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराशी मधुर संबंध प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न कराल... आणखी वाचा

वृषभ

आठवड्याचे सुरुवातीचे दिवस काम व आर्थिक दृष्टया शुभ फलदायी असल्याचे दिसत आहे. आपली सर्वच कामे विना अडथळा पूर्ण होतील. नोकरी - व्यवसाय किंवा कार्यक्षेत्राशी संबंधित समस्या दूर होतील. तसेच कर्ज, वसुली किंवा आर्थिक व्यवस्थेसाठी आपण केलेल्या प्रयत्नात यश प्राप्ती होईल... आणखी वाचा

मिथुन

हा आठवडा आपल्यासाठी शुभ घटनेने सुरु होत असल्याचे दिसत आहे. आपल्या सुख सोयीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. संतती संबंधी काही समस्या असल्यास त्याचे निराकरण होऊ शकेल. उच्च शिक्षण किंवा तांत्रिक शिक्षणाचा आपण विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा अनुकूलता लाभेल... आणखी वाचा

कर्क

हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. भावंडांचे सहकार्य मिळवू शकाल. भावंडांशी असलेली कटुता दूर होईल. प्रवासाचे आयोजन करू शकाल. ह्या आठवड्यात नवीन लिखाणास सुरवात करू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसून येईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे... आणखी वाचा

सिंह 

आठवड्याच्या सुरुवातीस नवीन कामाची सुरवात करण्यासाठी आपली धाडसी वृत्ती उफाळून येईल असे ग्रहमान बघता दिसत आहे. ग्रहमान अनुकूल असले तरी कोणत्याही कार्याची सुरवात करताना योग्य ती काळजी घेतल्यास ती फायद्याची ठरेल. उष्णतेचे किंवा त्वचेशी संबंधित विकार होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कन्या

आठवड्याच्या सुरुवातीस चंद्र आपल्या धनस्थानातून भ्रमण करत असल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक कार्यास विलंब संभवतो. कदाचित आठवड्याच्या मध्यास कौटुंबिक गोष्टींकडे आपले लक्ष कमी झाल्याने काही ताण निर्माण होऊ शकतो... आणखी वाचा 

तूळ 

हा आठवडा आपल्यासाठी उत्तमच आहे. आपली सर्जनात्मक शक्ती बहरून उठेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीसह हा आठवडा आनंदात घालवू शकाल. वस्त्र - आभूषणे किंवा मनोरंजनासाठी खर्च होईल. नातेवाईकांची भेट घडेल... आणखी वाचा

वृश्चिक

सुरुवातीच्या दिवशी आपली एकाग्रता कमी असेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. स्वकियांपासून दूर राहावे लागेल. या दरम्यान कोणाशीही आर्थिक व्यवहार न करण्याचा तसेच कोणालाही जामीन न राहण्याचा सल्ला आहे. कुटुंबीय व मित्रांसह फिरावयास जाऊ शकाल... आणखी वाचा

धनु 

हा आठवडा आपल्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक दृष्टया संतोषजनक आहे. मानसिक अशांती असल्यास ती दूर होईल. मनोबल दृढ झाल्याने निर्णय घेणे सोपे होईल. ह्या दरम्यान आपणास यश - कीर्ती - प्रतिष्ठा अचानकपणे लाभेल असे दिसते. नोकरीत बढती मिळेल... आणखी वाचा

मकर

हा आठवडा कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून आशास्पद असल्याचे दिसत आहे. नवीन नोकरीची संधी लाभू शकेल. एखाद्या सरकारी किंवा टेंडर संबंधी कामात अचानकपणे यश प्राप्त होईल. नवीन करार होतील. संततीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्पर्धात्मक परीक्षेत यशप्राप्ती होईल. नोकरीत बढती मिळेल... आणखी वाचा

कुंभ 

आठवड्यात मानसिक चिंता कमी होत असल्याचे जाणवेल. प्रकृतीत सुधारणा होईल. भागीदारी व्यवसायात काळजी घ्यावी लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात काही नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जर एखादी जुनी केस चालू असेल तर त्यात नवीन अडचणी उदभवतील. व्यापार - व्यवसाय उत्तम चालेल... आणखी वाचा

मीन 

वैवाहिक जीवनात जोडीदाराचे व व्यापारात भागीदाराचे सहकार्य लाभल्याने कौटुंबिक व व्यापार - व्यवसायातील वातावरणात अनुकूलता जाणवेल. नैराश्य दूर होईल. मान - सन्मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. अहंकार वाढीस लागेल, परंतु त्यामुळे व्यापाराकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष