शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

आठवड्याचे राशीभविष्य - 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 11:51 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. भागीदारीत आपणास लाभ प्राप्ती होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी लक्ष नसल्याने वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. एखादा जुना वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. थकवा व आळस ह्यामुळे कोणत्याही कामात आपले लक्ष लागणार नाही. नोकरी - व्यवसायात आपणास एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. रुचकर भोजनाचा आस्वाद व नवीन वस्त्र प्राप्तीचा आनंद उपभोगता येईल... आणखी वाचा

वृषभ

आठवड्याची सुरवात जरी चांगली झाली तरी सुद्धा हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच राहील. ह्या आठवड्यात आपल्या कामातील बहुतांश अडथळे दूर होतील. हळू हळू चिंता दूर होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील. नोकरी - व्यवसायातील कामगिरी अपेक्षेनुसार होईल. विरोधकांवर मात करू शकाल. एखाद्या कामगिरीमुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील, मात्र आठवड्याच्या मध्यास आपल्या कामाचा वेग मंदावेल... आणखी वाचा

मिथुन

थोडे सावध राहिल्यास हा आठवडा चांगला जाईल. ह्या आठवड्यात कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरवात ह्या आठवड्यात करू नये. नोकरी करणाऱ्यांना गुप्त शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व वडिलधार्यांकडून लाभ होऊ शकेल. सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. सांसारिक जीवनात आनंद राहील... आणखी वाचा

कर्क 

आठवडा आपणास अंशतः चांगला जाईल. आर्थिक बाबतीत आपणास काळजी घ्यावी लागेल. इतरांच्या भरंवशावर निर्णय घेणे आपणास महागात पडू शकेल. ह्या आठवड्यात शासकीय व कायदेशीर कामात सावध राहावे लागेल. खर्चात वाढ संभवते. मात्र, आर्थिक दृष्ट्या आठवडा चांगला आहे. हट्टीपणा सोडून आपणास आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जमीन - जुमल्याच्या कामात सावध राहावे लागेल. विद्यार्थ्यांचे एकाग्रचित्त होऊ शकणार नाही... आणखी वाचा

सिंह

आठवडा आपणास अनुकूल असणार आहे. मात्र, जमीन - जुमल्याच्या कामात आपणास सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्चात वाढ झाल्याने आपल्या चिंतेत भर पडेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. आर्थिक लाभ होऊन प्रतिष्ठेत भर पडेल. तसेच त्या दरम्यान विरोधकांवर आपण मात करू शकाल. एखाद्या क्षुल्लक कारणावरून मोठे भांडण होण्याची शक्यता असल्याने व्यक्तिगत व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. ह्या आठवड्यात आपण जर आत्मविश्वासाने कामे केलीत तर आपण यशस्वी होऊ शकाल... आणखी वाचा

कन्या

आठवडा आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. आपण पूर्ण आत्मविश्वासाने कोणतेही काम करू शकाल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मानात वाढ होईल. भागीदारीत आपला लाभ होईल. आर्थिक लाभ होतील. एखाद्या दीर्घ मुदतीच्या प्रकल्पात गुंतवणूक करणे हितावह होईल. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. मातुला कडून एखादी विशेष बातमी मिळेल... आणखी वाचा

तूळ 

आठवडा आपणास अपेक्षेनुसार चांगलाच जाईल. आपणास एखादी विशेष संधी मिळण्याची शक्यता असून त्याद्वारे आपले व्यापारी संबंध दृढ करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. आपले काम टाळण्या ऐवजी गंभीरतापुर्वक हळू हळू सगळी कामे करण्याचे आयोजन आपण करावे. आठवड्यात आपणास प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आपण जर विचारपूर्वक कामे केलीत तर आपणास कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात परदेशाशी संबंधात एखाद्या कामाने आपला लाभ होऊ शकतो... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडा आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. व्यापार - व्यवसायात उन्नती होईल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. आपण आपले उद्धिष्ट गाठू शकाल. शेअर्स बाजारातून सुद्धा लाभ होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने आपले जीवन सुखावह होईल. मात्र, दरम्यान एखादी आर्थिक देवाण - घेवाण करताना आपणास सावध राहावे लागेल. कोर्ट - कचगेरीच्या कामात सुद्धा आपणास सावध राहावे लागेल. धार्मिक कार्यासाठी खर्च करावा लागेल... आणखी वाचा

धनु

आठवडा आपणास सुखावह होईल. आठवड्यात आपण नवीन कामाची सुरवात करू शकाल. आर्थिक सुबत्ता येईल. आर्थिक लाभ संभवतात. एखादे महत्वाचे काम पूर्ण झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. काम पूर्ण करण्यासाठी आपली धावपळ होईल. महत्वाच्या कामासाठी आपणास बाहेरगावी जावे लागेल. एखादे महत्वाचे दस्तावेज हरविण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरी व सरकारी कामात सावध राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे... आणखी वाचा

मकर

आठवड्याची सुरवात चांगली झाली तरी उत्तरार्धात काही त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरीत आपले काम लक्षपूर्वक करावे लागेल. विरोधकांवर मात करू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. नवीन वस्त्र, आभूषण व वाहन ह्यांची खरेदी करू शकाल. एखादा लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागेल. आपली कामे संथ गतीने होतील. आपण दान - पुण्य व जनसेवेची कामे कराल. एखाद्या गरजवंतास मदत केल्याने आपण आनंदित व्हाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे... आणखी वाचा

कुंभ

थोडी काळजी घेतल्यास हा आठवडा चांगला जाईल. परदेशस्थ मित्रांकडून आपणास एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापार वृद्धीसाठी आपणास बाहेरगांवी जावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद टाळावे लागतील. विरोधकांच्या कारवाया वाढतील. मात्र, वडिलांकडून आपणास काही लाभ होऊ शकेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. शेअर्स - सट्ट्यात सुद्धा आपणास लाभ होऊ शकतो. उत्तरार्धात एकाग्रचित्ताच्या अभावामुळे आपली कामे होणार नाहीत... आणखी वाचा

मीन

महिन्याचा शेवटचा आठवडा आपणास विशेष अनुकूल नसला तरी काही बाबतीत अनुकूलतेचा ठरेल. ह्या दरम्यान छोट्या लाभा ऐवजी मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. व्यावसायिक कामा निमित्त आपणास घरा पासून दूर जावे लागेल. आर्थिक देवाण - घेवाण करण्यासाठी हा आठवडा अनुकूल नाही. नवीन कामाची सुरवात विचारपूर्वक करावी लागेल. ह्या आठवड्यात महत्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट - कचेरीत नुकसान संभवते. आपल्या मान - प्रतिष्ठेत वृद्धी होईल... आणखी वाचा 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष