शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आठवड्याचे राशीभविष्य - 21 जुलै ते 27 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 11:05 AM

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

 

आठवड्याची सुरुवात साधारणच राहिली तरी उत्तरार्ध मात्र आपल्यासाठी चांगला आहे. आपणास आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या आठवड्यात आपण भले व आपले काम भले हे ध्येय ठेवावे लागेल. आपणास आर्थिक लाभ होऊ शकतो. आपणास वरिष्ठांच्या व्यतिरिक्त सहकाऱ्यांशी सुद्धा विनम्रतेने वागावे लागेल. आपण खर्च करताना जरी कंजूषपणा केला नाहीत तरी अतिरिक्त खर्चामुळे आपण उदास व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल... आणखी वाचा

वृषभ 

आठवड्याची सुरुवात चांगली झाली तरी दुसऱ्या पर्वात काही त्रास होण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक आयोजनात आपण सहभागी होऊ शकाल. परोपकार व जनसेवेच्या कार्यात आपली गोडी वाढेल. एखाद्या धार्मिक पुस्तकाचे सुद्धा वाचन होऊ शकेल. नोकरी - व्यवसायात आपले मन रमेल. आपण प्राप्तीत वाढ करण्याचा सुद्धा विचार करू शकाल. व्यापारात विरोधकांवर आपण मात करू शकाल. मात्र, जमीन - जुमल्याशी संबंधित कार्यात सावध राहण्याची आवश्यकता आहे... आणखी वाचा

मिथुन 

आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी उत्तम झाली तरी दुसऱ्या पर्वात थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या नंतर येणारा कालखंड आपल्यासाठी उत्तम असेल. त्यामुळे आपणास आत्ता पासूनच तयारी करण्याची गरज आहे. ह्या आठवड्यात व्यापार - व्यवसायासाठी एखादा प्रवास करावा लागेल. विरोधकांवर आपण मात करू शकाल. दलाली किंवा कमिशन सारख्या कामातून सुद्धा उत्तम प्राप्ती होऊ शकेल. एखाद्या चांगल्या प्रकल्पात गुंतवणूक करू शकाल... आणखी वाचा

कर्क 

महिन्याचा शेवटचा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. ह्या दरम्यान आपणास सावध राहावे लागेल. आपणास कामाकडे सुद्धा जास्त लक्ष द्यावे लागेल. कामात लक्ष न लागल्याने वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील.आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात आपण व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न करू शकता. व्यापार किंवा व्यवसायासाठी केलेल्या कामात आपणास यश प्राप्ती होऊ शकेल. आपण एखादे कर्ज सुद्धा काढू शकाल. नोकरी करणारे एखाद्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बाहेरगांवी जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकतील... आणखी वाचा

सिंह

आठवड्यात व्यापार - व्यवसायातील कायदेशीर अडचणी दूर होतील. व्यापारवृद्धीसाठी आपणास प्रवास करावा लागेल. कार्यालयात किंवा व्यापारात विरोधकांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका, ते आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात व्यावसायिक बाबतीत आपणास अधिक कष्ट करावे लागतील. मात्र, आर्थिक प्राप्ती चालूच राहील. ह्या आठवड्यात विशेष असा अतिरिक्त खर्च होणार नाही... आणखी वाचा

कन्या

आठवड्यात व्यापारात व कार्यालयात काही नवीन उद्दिष्टांचा सामना आपणास करावा लागेल. असे असले तरी आपली कामे सहजपणे होऊ शकतील. कामे सहजपणे पार पडल्याने आपणास जवाबदारीतून मोकळे झाल्याचे वाटल्याने आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्रशासकीय क्षमतेमुळे आपण एकाच वेळी अनेक कामे करू शकाल. ह्या आठवड्यात शेअर्स बाजारात केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून भविष्यात आपणास मोठा फायदा होऊ शकेल... आणखी वाचा

तूळ

आठवड्याची सुरुवात जरी निराशाजनक झाली तरी शेवटी स्थितीत सुधारणा होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात आपणास संयम बाळगावा लागेल. आठवड्यात एखाद्या सरकारी कामात विलंब झाल्याने आपले मन खिन्न होईल. मागील काही दिवसात हौस - मौज करताना अपूर्ण राहिलेली कामे ह्या आठवड्यात पूर्ण करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. घरी काही पाहुणे आल्याने खर्च होईल. शेअर्स बाजारातून काही लाभ होऊ शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. एखाद्या अनावश्यक कामात पैसे खर्च होतील. सरकारी कामात विलंब होईल. विरोधक आपल्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी विरोधकांशी वाद टाळणे हितावह होईल. आठवड्याच्या मध्यास व्यापार व व्यवसायात उन्नती होईल. हा आठवडा वसुली करण्यासाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांनी ह्या आठवड्यात अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण शांततामय राहील. नातेवाईक व मित्रांचा सुखद सहवास लाभेल... आणखी वाचा

धनु 

आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. धार्मिक व आध्यात्मिक कामातील आपली गोडी वाढेल. ह्या आठवड्यात प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उसने दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कामात सुद्धा यश प्राप्ती होईल. मात्र, आठवड्याच्या अखेरीस एखाद्या कामात यश प्राप्ती न झाल्याने आपले मन उदास होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या भावंडांशी संबंधात सौहार्दता टिकून राहील... आणखी वाचा

मकर

आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आहे. ह्या आठवड्यात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. सरकारी कामात आपणास त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, व्यापार वृद्धीचा विचार आपण करू शकाल. आपल्या कष्टाला न्याय मिळेल. मात्र, व्यावसायिक कामांसाठी आपली धावपळ वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. मात्र, आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात सरकारी कामात त्रास होईल. शत्रू नुकसान करतील. व्यावसायिक क्षेत्रातील प्रगती मंदावल्याने आपले नुकसान होईल... आणखी वाचा

कुंभ

महिन्याचा शेवटचा आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला राहील. ह्या दरम्यान आपण आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. विदेशात जाण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना सुद्धा ह्या आठवड्यात यश मिळू शकेल. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी हा आठवडा उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या विचारांना महत्व देण्यात येईल. ह्या आठवड्यात आपणास नवीन संधी मिळू शकेल. आपण संधी ओळखून त्याचा फायदा घ्यावा... आणखी वाचा

मीन

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्यात आपण कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नये. लक्षपूर्वक आपली कामे करावीत. लहान - सहान ध्येयपूर्ती केल्याने कुटुंब व समाज ह्या व्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी समजूतदारपणा दाखविण्यात मदत होऊ शकेल. एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न केल्यास आपले कोणतेच काम पूर्ण होऊ शकणार नाही. आयात - निर्यातीशी संबंधित व्यापारात फायदा होऊ शकेल. आर्थिक लाभ प्राप्तीसाठी आपण अनेक उपाय कराल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष