शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

आठवड्याचे राशीभविष्य - 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 09:38 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास एकांतात राहण्याची इच्छा झाली तरी उत्तरार्धात आनंद - प्रमादात आपण व्यस्त राहाल. आठवड्याच्या सुरवातीस संपत्ती / स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची तीव्र इच्छा होईल. मात्र आपणास अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल व अपेक्षित सौदा करण्यात सुद्धा अडचणी येतील. आपणास व्यवहारात दक्ष राहावे लागेल, अन्यथा घाईघाईत घेतलेले निर्णय भविष्यात डोईजड होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कार्यात अतिरिक्त खर्च किंवा आर्थिक तोटा होण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यापाराशी संबंधित प्रवृत्तीत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

वृषभ

आठवड्याची सुरुवात चांगली आहे. परंतु मध्यास कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबासाठी प्राधान्य कशात आहे ते समजून घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे. ग्रहांची अनुकूलता लाभणार असल्याने निराश होण्याची गरज नाही. कामात बौद्धिक प्रतिभेने वाटचाल करण्याची आपली वृत्ती राहील. तांत्रिक कामाशी संबंधित लोकांना सध्या मंदीचा सामना सुद्धा करावा लागेल. आपणास अनपेक्षित अशी आर्थिक भीती सतावेल. अशा परिस्थितीत आपणास आवश्यक खर्चांचे नियोजन करावे लागेल. विद्यार्थ्यांना अनुकूल - प्रतिकूल परिस्थिती असल्याचे जाणवेल... आणखी वाचा

मिथुन​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस व्यावसायिक आघाडीवर आपला आत्मविश्वास अधिक प्रबळ होईल. विशेषतः नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उंचावेल. पूर्वार्धात प्राप्तीच्या नियमित साधनातून फायदे मिळवू शकाल. भागीदारी कार्यात पुढील मार्गक्रमण करण्याची किंवा नवीन करार करण्याची सध्या घाई करू नये. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल, अन्यथा एखादा चुकीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना काही अडचणी असल्यास उत्तरार्धात त्या दूर होतील. उच्च शिक्षणाची संधी मिळेल... आणखी वाचा

कर्क ​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस आपण संबंधावर अधिक लक्ष केंद्रित कराल. त्यात सुद्धा प्रणयी जीवन किंवा वैवाहिक जीवन व संततीशी संबंधित बाबींसाठी आपण अधिक वेळ द्याल. कौटुंबिक व व्यावसायिक जीवन ह्यात समतोल साधण्यात आपली बहुतांश शक्ती खर्च होईल. दूरवरचे संपर्क किंवा आधुनिक माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तीशी सुद्धा संबंध जुळल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नोकरीतील कामगिरी चांगली होईल व आपल्या हाती असलेली कामे आपण उत्साहात पूर्ण करू शकाल... आणखी वाचा

सिंह

आठवड्याच्या सुरवातीस मनन व चिंतन करून समाधान व आनंद मिळेल. अशांती, अधीरता व धुनी वर्तन आपल्या वैयक्तिक जीवनात अडथळा निर्माण करण्याची शक्यता असल्याने शांतिपूर्वक काम करणे हितावह होईल. अधिक जोश, उत्साह व अधीरता ह्यामुळे प्रसंगानुरूप वाद - विवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. मात्र, समजूतदारपणाने संबंध उच्च स्तरावर नेण्यात यशस्वी होता येईल. आठवड्याच्या मध्यास पित्त विकार व वात विकार ह्यांचा त्रास सुद्धा सतत होईल. शक्य तितके अधिक पाणी प्यावे अन्यथा पचनाचे विकार अधिक तीव्र होतील... आणखी वाचा

कन्या​​​​​​​

आठवड्याच्या सुरवातीस प्रवासाची शक्यता असली तरी जलदगतीने वाहन चालवू नये. हाती घेतलेल्या कामात सहजपणे प्रगती साधू शकाल व आपण निर्धारित केलेली उद्दिष्टे गाठून वरिष्ठांच्या प्रशंसेस पात्र व्हाल किंवा व्यापार करत असल्यास गिर्हाईकांच्या मनात आपली प्रतिमा उंचावू शकाल. आठवड्याच्या मध्यास जनसेवेची भावना प्रबळ झाल्याने इतरांना मदतरूप होण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने मन आनंदित होईल परंतु विशेषतः कौटुंबिक संबंधांचे चिंतन करण्यास आपल्याला शिकावे लागेल अन्यथा विनाकारण गैरसमज होऊन तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते... आणखी वाचा

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीस प्रत्येक गोष्टीचा व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण विचार कराल. आपल्या बहुतांश कार्यात प्राप्तीत वृद्धी करण्याचा विचार अग्रस्थानी असेल. सुरवातीस आपल्या वक्तव्याने इतरांना आपले म्हणणे पटवून देऊन आपली कामे पूर्ण कराल. प्रणयी जीवनात सुद्धा प्रेम व्यक्त करण्यासाठी पूर्वार्ध अनुकूल आहे. ह्या आठवड्यात एकंदरीत आपले आरोग्य उत्तम राहिले तरी सुद्धा आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी कामाच्या प्रमाणात योग्य विश्रांती घ्यावी, तसेच व्यायाम, प्राणायाम व योगासने करावीत... आणखी वाचा

वृश्चिक​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस नोकरी करणाऱ्यांची उत्तम कामगिरी झाल्या बद्धल वरिष्ठ प्रशंसा करतील. पूर्वीचा थकवा व बेचैनी दूर झाल्याने आपण नवीन उत्साह व विचारांसह वाटचाल कराल. आपण शारीरिक व मानसिक स्वस्थतेमुळे आपली कामे नियोजनानुसार पूर्ण करू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी आपणास आर्थिक नियोजन करण्यास शिकावे लागेल, अन्यथा कितीही पैसा कमविला तरी आपल्या हाती मोठी रक्कम न राहण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण सौंदर्य प्रसाधने, वस्त्रालंकार, व्यक्तिमत्व विकास ह्यावर खर्च करण्याची शक्यता सुद्धा आहे... आणखी वाचा

धनु​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास मानसिक त्रास जाणवेल. जर पैशांची आगाऊ तरतूद केली नसेल तर आर्थिक चणचण जाणवेल. शक्यतो कोणा समोर हात पसरू नका. कामाकडे आपले लक्ष कमी असेल. सुरवातीस आपणास संबंधांची सुद्धा काळजी वाटेल. अशा परिस्थितीत आत्मचिंतन केल्याने आपणास फायदा होईल. आठवड्याच्या मध्यास कोणत्याही प्रकारे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामात अपेक्षित यश मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनासाठी खर्च कराल... आणखी वाचा

मकर

​​​​​​​नोकरीत वरिष्ठांच्या कृपेने नवीन जवाबदारीचे पद मिळण्याची किंवा एखादा सन्मान होण्याची शक्यता आहे. तसेच व्यापार - व्यवसायात सुद्धा उज्वल दिवस असल्याचे दिसत आहे. आपण आपल्या कामात अधिक मेहनत कराल व भविष्यात त्याचा चांगला फायदा मिळवू शकाल. नोकरी - व्यवसायात तीव्र स्पर्धेला तोंड देण्यास आपण समर्थ व्हाल. आपणास नवीन कार्य सुरु करण्याची प्रेरणा होईल. आठवड्याच्या मध्यास निर्णय घेण्यात काहीशी अनिश्चितता राहील किंवा कामात लक्ष कमी लागेल. मात्र, उत्तरार्धात आपण पुन्हा उत्साहाने आपली कामे करू लागाल... आणखी वाचा

कुंभ​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस व्यावसायिक आघाडीवर आपण अधिक सक्रिय व्हाल. आपणास एखाद्या महत्वाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. इतकेच नव्हे तर घेतलेल्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमल बजावणी करण्याची सुनिश्चित्ती करावी लागेल. आपण जर योग्य प्रकारे काम केलेत तर यशाचे शिखर गाठू शकाल. नोकरी करणाऱ्यांचे कार्यालयात वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध राहतील, तसेच स्वतःच्या कामाच्या जोरावर कार्यालयात इतरांना प्रभावित करता येईल. आठवड्याच्या मध्यास प्रियव्यक्तीसह आपण आनंदात वेळ घालवू शकाल... आणखी वाचा

मीन 

व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आपणास विविध क्षेत्रात लाभ व यशकीर्ती प्राप्त होईल. व्यावसायिक व व्यक्तिगत जीवनात कामाचा भार वाढेल व आपण सर्व आघाडीवर लढण्यासाठी सतत व्यस्त राहाल व आपल्या सर्व प्रयत्नांचे आर्थिक फळ मिळत असल्याने आपला जोश कमी होणार नाही. ह्या आठवड्यात मातेकडून आपला लाभ होण्याची शक्यता आहे. कामात बदल करण्याच्या बाबतीत आपल्या मनात सतत विचार बदलत राहतील त्यावर नियंत्रण ठेवावे. अनेक लोकांना भेटून आपण विचारांची देवाण - घेवाण करू शकाल... आणखी वाचा

​​​​​​​

टॅग्स :Astrologyफलज्योतिष