शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 10:36 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

आठवड्याच्या सुरवातीस खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. आपणास क्रोध व आवेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. प्रकृतीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ह्या आठवड्याच्या मध्यास कोणाला उसने पैसे देऊ नयेत, दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता नाही... आणखी वाचा

वृषभ

आठवड्याच्या सुरुवातीस आर्थिक स्थिती उत्तम राहील. अडकलेले पैसे मिळतील. स्वादिष्ठ भोजनाचा आस्वाद घेता येईल. मित्रांसह हास्य विनोद करू शकाल. स्त्री कडून लाभ होईल. शुभ कार्य, विद्या व संतती संबंधी काही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. जे भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरतील. सासुरवाडीकडून व पत्नीकडून लाभ होण्याची अपेक्षा बाळगू शकाल... आणखी वाचा

मिथुन

आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. वरिष्ठ, सहकारी, मित्र व कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक दृष्टया सुद्धा हा आठवडा चांगला आहे. कुटुंबियांसह बाहेरगावी जाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकाल. व्यावसायिक भागीदाराशी व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवरून काही मतभेद संभवतात... आणखी वाचा

कर्क

आठवडा आपल्यासाठी काहीसा चढ उताराचा असल्याचे दिसत आहे. ह्या आठवड्यात नोकरी - व्यवसायात अधिक चांगले परिणाम मिळू शकतील. पूर्वी पेक्षा हा आठवडा अधिक अनुकूल असल्याचे दिसत आहे. ह्या आठवड्यात परीक्षार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल असे दिसत आहे. आपली आर्थिक स्थिती अधिक सुदृढ करण्यासाठी आपणास योग्य संधी लाभू शकेल... आणखी वाचा

सिंह

आठवड्याच्या सुरुवातीस आपले मन काहीसे व्याकुळ होईल व त्यामुळे योग्य निर्णय घेण्यात दिरंगाई होईल. सांधेदुखीचा त्रास व रक्ताभिसरणाचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. त्रास बळावण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हावे लागेल. मात्र आपल्या यशाचे श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याने आपल्या संबंधात ताण निर्माण होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कन्या​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस कष्टाच्या प्रमाणात यश प्राप्ती कमी होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल, मात्र आपल्या जोडीदाराच्या रागास सामोरे जावे लागल्याने परिस्थितीस शांत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या मध्यास आपल्या मनाची चंचलता वाढण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

तूळ

आठवड्याच्या सुरुवातीचा दिवस अत्यंत आनंददायी आहे. नोकरी - व्यवसायात चांगला फायदा होईल. मातुला कडून काही विशेष चांगली बातमी मिळेल. त्यांच्या कडून काही फायदा होईल. मात्र, प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. एखादा लहानसा प्रवास संभवतो. हातून एखादे धार्मिक किंवा पुण्य कार्य घडेल... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवड्याचा सुरुवातीचा दिवस सुखात जाईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. संततीकडून आपणास चांगली बातमी मिळेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा आनंद घेऊ शकाल. स्त्री मित्रांचे सहकार्य लाभेल. मानसिक व शारीरिक दृष्टया आपणास ताजे तवाने वाटेल. अतिरिक्त विचार करून आपले मन विचलित होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

धनु 

आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. आपले लेखन साहित्य प्रकाशित होऊ शकेल. कुटुंबियांसह एखादा लहानसा प्रवास करू शकाल. घरात पूजेचे आयोजन होऊ शकेल. मालमत्ते संबंधी काही वाटाघाटी होतील व त्यासाठी बाहेरगावी जावे लागेल. घराचा शोध पूर्ण होईल... आणखी वाचा

मकर

आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेल्या आपल्या साहित्याचे प्रकाशन होऊ शकेल. धार्मिक स्थळांचा प्रवास करू शकाल. भावंडांशी संबंधात सौहार्द निर्माण होईल. कौटुंबिक समस्या किंवा कटुता दूर होण्याची शक्यता आहे. जुने घर किंवा वाहन विक्री होऊ शकेल... आणखी वाचा 

कुंभ

संबंधात कटुता निर्माण झाली असल्यास किंवा भावना दुखावल्या गेल्या असल्यास भाषेतील माधुर्याने पुन्हा गोडवा निर्माण करता येऊ शकेल. मित्र मंडळात एकमेकांशी जवळीक साधता येईल. आर्थिक स्थिती सुधारताना दिसून येईल. नोकरीत असणाऱ्यांना बढती व आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मीन 

आठवड्यात मन प्रसन्न राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील, मित्र वर्तुळातील तसेच प्रणयी जीवनातील अडचणी दूर होतील. मैत्री व प्रेमाची देवाण - घेवाण करण्यास अनुकूलता लाभेल. वाणीत माधुर्य वाढत असल्याची जाणीव होईल. आर्थिक सुधारणा होईल. प्राप्तीत वाढ होईल... आणखी वाचा​​​​​​​

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष