शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 11:05 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवडा आपणास अत्यंत अनुकूल आहे. मात्र, कामातील घाईगर्दी आपणास टाळावी लागेल. झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न सोडावे लागेल. कोणत्याही नवीन कामाची सुरवात करण्यास हा आठवडा उत्तम आहे. ह्या दरम्यान अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून सुद्धा काही लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या योजना यशस्वी झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ होईल. प्राप्तीत वाढ होईल. अडकलेला पैसा हाती आल्याने आर्थिक स्थिती सुदृढ होईल... आणखी वाचा

वृषभ

आठवडा आपणास मिश्र फले देणारा आहे. दृढता व आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर आपण कार्यात यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये. आपल्या सर्जनात्मक व कलात्मक शक्तीत वृद्धी होईल. कोणत्याही प्रकारच्या लेखी व्यवहारात सावध राहावे लागेल, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. मनाची एकाग्रता राखून ठेवावी लागेल. हा आठवडा महत्वाचे निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. यशस्वी होण्यासाठी परिश्रमात वाढ करावी लागेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील... आणखी वाचा

मिथुन

आठवड्यात आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. व्यापारात विरोधक आपल्या विरुद्ध आघाडी उभारतील, मात्र आपण त्यास खंबीरपणे सामोरे जाऊ शकाल. आठवड्याच्या मध्यास परिस्थिती आपणास अनुकूल होईल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्थायी संपत्तीच्या बाबतीत आपणास लाभ होईल. मौजमजा, गृह सजावट किंवा वैभवी जीवनशैली ह्यासाठी आधुनिक उपकरणांची खरेदी करू शकाल... आणखी वाचा

कर्क

आठवड्याची सुरवात उत्तम होईल. व्यापारात अपेक्षित यश प्राप्ती होईल. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. शासकीय कामात यश प्राप्त होईल. मात्र त्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. मनातील गोंधळामुळे आपण कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. ह्या आठवड्यात आर्थिक देवाण - घेवाण करू नये. व्यापारासाठी कर्ज काढण्याची आवश्यकता असल्यास आपणास वाट पाहावी लागेल. भविष्यासाठी आर्थिक योजना आखू शकाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त होऊ शकेल. ह्या आठवड्यात मौज - मजा व मनोरंजन करण्यात वेळ जाईल... आणखी वाचा

सिंह

आठवडा मिश्र फलदायी आहे. कष्टाच्या मानाने यश प्राप्ती कमी झाल्याने आपली मोठी निराशा होईल. नोकरीत जपून राहावे लागेल. विरोधक व वरिष्ठ ह्यांच्याशी संवाद साधताना सतर्क राहावे लागेल. व्यवसायिक दृष्ट्या परिस्थिती अनुकूल राहील. ह्या आठवड्यात आपणास धन लाभ होईल, त्याच बरोबर आपण एखादी दीर्घ कालीन आर्थिक योजना आखू शकाल. ह्या राशीचे व्यावसायिक आपल्या व्यवसाय वृद्धीची योजना तयार करू शकतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही... आणखी वाचा

कन्या 

आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. सरकारी कामात यश प्राप्ती होईल. कामाचा व्याप वाढला तरी आर्थिक लाभ होईल. कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदातच राहाल. नोकरी करणाऱ्यांना एखादे नवीन उद्दिष्ट गाठण्याची संधी मिळू शकेल. व्यापारात आपल्या विचारांना महत्व येईल. भागीदार सुद्धा आपले विश्लेषण मान्य करतील. व्यापार व नोकरीत अपेक्षित यश मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबातील महिलां कडून काही लाभ होईल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची काळजी वाटत राहील. संशोधन कार्याकडे त्यांचे लक्ष लागेल... आणखी वाचा

तूळ

आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आहे. एखाद्या कार्य योजनेत आपणास शासकीय मदत मिळेल. कामाच्या व्यापामुळे आरोग्यावर सुद्धा परिणाम होईल. सामाजिक कार्यात व मित्रांसह धावपळ करण्यात वेळे बरोबरच पैसा सुद्धा खर्च होईल. परंतु, उत्तरार्धात धनलाभ झाल्याने आपल्या चेहेऱ्यावर आनंद उमटून येईल. ह्या दरम्यान कोणाशीही आर्थिक देवाण - घेवाण करू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकाल. जोडीदार व मुलांसह वेळ घालवून आनंद प्राप्ती होईल... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांकडून कडवी झुंज मिळेल. आपणास अथक परिश्रम करूनच यश मिळेल. कामाच्या धावपळीत कुटुंबीयांकडे काहीसे दुर्लक्ष होईल. ह्या दरम्यान अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. आपल्या कारकिर्दीची निवड करताना त्यांच्या मनाचा गोंधळ उडेल. ह्या आठवड्यात आपला राग नियंत्रित ठेवा, अन्यथा त्याचा परिणाम आपल्या संबंधांवर व कामगिरीवर होऊ शकतो... आणखी वाचा

धनु

आठवड्यात आपणास सावध राहावे लागेल. कोणत्याही नवीन कामाची सुरवात पुढे ढकलणे हितावह होईल. शत्रूंच्या कारवाया वाढतील, तेव्हा सावध असावे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकणार नाही. आठवड्याच्या सुरवातीस कामात सुद्धा विलंब होईल. त्यामुळे आपण क्रोधीत होण्याची शक्यता आहे. नियोजित काम करण्यासाठी आपण प्रेरित व्हाल. ह्या दरम्यान आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा सापडणार नाही, अशा परिस्थितीत आपले कोणतेही काम सारासार विचार करूनच करावे... आणखी वाचा

मकर 

आठवडा विरोधकांपासून सावध राहण्याचा आहे. नोकरीत नवीन उद्दिष्टे गाठण्याची आपणास संधी मिळाल्याने विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपण आपले काम नेटाने करावे. व्यापारात भागीदाराशी वाद घालू नये. व्यापार वृद्धी करताना नवीन लोकांचा सहवास घडेल. उत्तरार्धात व्यापारातून धन व सन्मान प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी महत्वाच्या मुद्द्यावर विचार - विमर्श करू शकाल. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत प्राप्त होईल. ह्या आठवड्यात प्राप्ती व खर्च ह्यात समतोल साधला जाईल... आणखी वाचा 

कुंभ

आठवडा आपणास मध्यम फले देणारा आहे. लहान - सहान कारणांवरून आपली लगेच चिडचिड होऊ लागेल. अशा वेळेस आपणास अत्यंत संयमात राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तरार्ध चांगला होऊ शकतो. वरिष्ठांच्या मदतीने आपण आपले उद्दिष्ट गाठू शकाल. आपण जर एखाद्या सरकारी किंवा बिन सरकारी प्रकल्पासाठी काम करत असाल तर ह्या आठवड्याच्या उत्तरार्धात आपण त्यात सहजपणे यशस्वी होऊ शकाल. व्यापारासाठी आपण आपले जाळे पसरवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. त्याचा आपणास भविष्यात फायदा होईल... आणखी वाचा

मीन

आठवड्यात आपली धावपळ होणार आहे. कार्यालयात वरिष्ठ आपल्याशी एखाद्या महत्वाच्या प्रकल्पावर चर्चा करतील. ह्या आठवड्यात एखाद्या कामासाठी किंवा प्रकल्पासाठी सरकार कडून काही मदत आपणास मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामासाठी एखादा प्रवास संभवतो. व्यापारात नवीन काही तरी करण्यात उत्साह वाटेल. एखाद्या लहानशा कामात यशस्वी झाल्याने मात्र अति उत्साहित होऊ नका. ह्या आठवड्यात घरात फेरबदल करून त्यास अधिक सुशोभित करण्याचा प्रयत्न कराल. त्यात बराचसा पैसा खर्च होईल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष