शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 09:32 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

मौन व शांतपणा ह्याने आपल्या अनेक समस्या कमी होतील. अपयश किंवा पूर्वीच्या चुकांच्या आठवणीने अश्रू ढाळण्याचे सोडून चुका सुधारून यश प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थितीत नक्कीच सुधारणा होईल. प्रत्येक गोष्टीस इतरांच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न सुद्धा करावा. आठवड्याच्या उत्तरार्धात खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण जाणवेल. अशा परिस्थितीत आध्यात्मिकता व नामस्मरण लाभदायी होऊ शकेल. आपणास नशिबाची साथ मिळण्यात अनिश्चितता असल्याचे दिसून येईल. एखाद्या छोट्या प्रवासास किंवा धार्मिक स्थळी जाणे संभवते. शेवटचे दोन दिवस वगळल्यास आरोग्य चांगले राहील... आणखी वाचा

वृषभ

आपण निष्ठेने काम केल्यास आपली प्रगती कोणी रोखू शकणार नाही. कार्यालयीन वातावरण सहकार्याचे राहील. आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. आपले यश बघून प्रतिस्पर्धी किंवा विरोधक आश्चर्यचकित होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने बालपणातील स्मृती ताज्या होतील. ह्या व्यतिरिक्त स्वादिष्ट भोजन, नवीन वस्त्रालंकार ह्यांची प्राप्ती सुद्धा संभवते. वाहन खरेदीस हा आठवडा अनुकूल आहे. सार्वजनिक क्षेत्रात मान - सन्मान तसेच व्यावसायिक आघाडीवर भागीदारीत लाभ होईल. एखाद्या आवडत्या व्यक्ती समक्ष प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यासाठी योग्य वेळ येण्याची थोडी वाट बघावी लागेल. असे असले तरी उत्तरार्ध चांगला असल्याचे म्हणता येईल... आणखी वाचा

मिथुन

मुलांच्या शिक्षणामुळे आपल्या खर्चात वाढ होईल. मित्र, नातेवाईक व कुटुंबियांसह आपण अत्यंत आनंदात हा आठवडा घालवू शकाल. आपणास उत्तम शारीरिक व मानसिक सौख्य लाभेल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वैवाहिक जोडीदाराप्रती आपले आकर्षण वाढेल. आपणास व्यापारी भागीदारी किंवा नोकरीतील सांघिक कामगिरी ह्यातील समस्यांची काहीशी काळजी वाटत राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. सुरुवातीस प्रकृती थोडी नरम - गरम राहील. उजव्या डोळ्यास त्रास होईल. नवीन कार्याची सुरवात करण्यास उत्तरार्ध अनुकूल आहे... आणखी वाचा

कर्क 

आठवड्याच्या सुरवातीस सामाजिक कार्यात सुद्धा सहभागी व्हावे लागेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांचे सौख्य प्राप्त होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. दूरवर राहणाऱ्या संततीचा सहवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. मित्र व कुटुंबियांच्या सहवासात आठवडा आनंदात घालवू शकाल. आपली निर्णयक्षमता दुर्बल होईल. कौटुंबिक कार्यासाठी खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासातील मेहनत वाढवावी लागेल... आणखी वाचा

सिंह

कौटुंबिक सुख - शांती लाभेल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आपणास कार्यात यश तर मिळेलच, शिवाय प्रत्येक कार्यात उत्तम मार्गदर्शन सुद्धा मिळू शकेल. आपल्या मान - प्रतिष्ठेत वृद्धी होईल. कुटुंबीय किंवा प्रियव्यक्तीसह आपण सहलीस जाण्याची शक्यता सुद्धा आहे. दांपत्य जीवनातील सुखद क्षणांचा आनंद उपभोगू शकाल, मात्र संबंधात गैरसमज किंवा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक बाबतीत पारदर्शकता ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नियमित व्यायाम, योगासन व प्राणायाम करून आपण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकाल... आणखी वाचा

कन्या 

माता व कुटुंबियांशी जवळीक वाढेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठेत वाढ झाल्याने आपण खुश व्हाल. आरोग्य उत्तम राहील. आपणास अचानक धनलाभ व विविध लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र, नातेवाईक व प्रियजनांचा सहवास आनंददायी होईल. व्यापारी सौद्यात फायदा होईल. पुत्र व पत्नी कडून लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. प्रवास, सहलीचे आयोजन करू शकाल. विवाहेच्छुकांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. आठवड्याच्या मध्यास शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल... आणखी वाचा

तूळ 

सध्या आपल्यात शक्ती व उत्साहाचा संचार होईल, ज्याचा योग्य दिशेत वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे आपण अनेक कामे झटपट व उत्तमरीत्या पूर्ण करू शकाल. ह्याच बरोबर आपणास सामाजिक व सामूहिक कामे करावी लागतील. सध्या आपण फक्त दोन गरजांवर लक्ष द्याल - पैसा व कुटुंब. आपल्या स्वतःच्या योजना, आशा ह्यांना मूर्त स्वरूप देण्यासाठी खर्च करावा लागेल असे दिसत आहे. त्याच बरोबर जोखीम वाढणार असल्याने नवीन धाडस करताना सावधपणे पाऊल उचलावे. इतरांवर विसंबून राहिल्यास आपले नुकसान होईल... आणखी वाचा

वृश्चिक

कोणत्याही कार्यात यश प्राप्तीसाठी जरुरी साधन सामग्री असण्याची गरज असून त्यांची योग्य वेळी प्राप्ती होणे आवश्यक असते. आपण इतक्या जोमाने काम कराल कि कोणतेही काम अर्धवट सोडणार नाही. जीवनातील मोठे व दीर्घकालीन आयोजन कराल. आर्थिक बाबतीत सध्या कोणावर विश्वास ठेवू नका. सध्याचे दिवस नवीन निमंत्रण व सामाजिक जवाबदाऱ्या स्वीकारण्याचे आहेत. आपण नवीन काही करण्यास उत्सुक व्हाल. आपल्याकडे नवीन कामे येतील व त्यामुळे आपली प्रगती होईल. आपण आपली उत्तम कामगिरी करण्यास कटिबद्ध असल्याने यश आपल्याकडे समोरून चालत येईल... आणखी वाचा

धनु 

आठवड्यात आपण कोणत्याही कौटुंबिक कामाच्या बाबतीत त्वरित निर्णय घेऊ शकाल. पिता किंवा वडिलधार्यांकडून मिळणाऱ्या लाभात विलंब होईल. आपल्या प्राप्तीत वृद्धी झाल्याने समाजात मान - प्रतिष्ठेत वृद्धी होईल. सुरवातीस आपल्या वाणीच्या प्रभावाने आपण आर्थिक कामे त्वरित करू शकाल. आपण कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबियांसह वेळ मजेत घालवू शकाल. स्त्री मित्रांची मदत होईल. दूरवर राहणारे मित्र, स्नेहीजनांचा संपर्क होऊन लाभ होईल. आठवडा सुख - शांतीत घालवू शकाल. आपणास आपल्या भावंडांची जवळीक जाणवेल व त्यांचे पूर्ण सहकार्य मिळवू शकाल... आणखी वाचा

मकर

वरिष्ठ आपल्या कामगिरीबर खुश होतील. व्यापारीवर्ग फायद्याचे सौदे करू शकेल. पित्याशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून काही लाभ सुद्धा होईल. संपत्ती, जमीन - जुमला व वाहनाशी संबंधित कामे सहजपणे पूर्ण होतील. कायदेशीर कामात यश प्राप्ती होईल. कौटुंबिक जीवन सुख व संवादाने भरलेले राहील. आपल्या व्यापार - व्यवसायात लाभ होऊन प्राप्तीत वृद्धी होईल. मित्रांसह बाहेर फिरावयास जाण्याचे व भोजन करण्याचे आयोजन करू शकाल. स्त्री मित्रांची मदत होईल. संतती कडून चांगली बातमी व वडिलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल... आणखी वाचा

कुंभ

आठवड्याच्या सुरुवातीस सांसारिक बाबतीत आपली वृत्ती उदासीन राहील. भिन्नलिंगी व्यक्तींच्या सहवासात विशेष आनंद मिळणार नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. आरोग्यास आपले प्राधान्य राहील. आरोग्य बिघडल्याने औषधोपचारावर खर्च करावा लागेल. क्रोधामुळे बोलण्यावर संयम राहणार नाही. परिणामतः कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. नकारात्मक विचार चुकीच्या मार्गावर घेऊन जाणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. असे असले तरी, आठवड्याच्या तिसऱ्या दिवसापासून आपल्या शारीरिक स्थितीत व विचारसरणीत सुधारणा होऊ लागेल... आणखी वाचा

मीन

व्यापारात किंवा नोकरीत आपले प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. वरिष्ठांची आपल्यावर कृपादृष्टी राहील. आपल्या प्रभावात व वर्चस्वात वाढ झाल्याने पत - प्रतिष्ठा सुद्धा वाढेल. दगदगीच्या जीवनातून मोकळीक मिळण्यासाठी कुटुंबियांसह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाण्याचे आयोजन करू शकाल. उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. आपले दृढ मनोबल व भरपूर आत्मविश्वास कामी येईल. व्यावसायिक आघाडीवर सुद्धा आपल्या बुद्धीची व प्रतिभेची कदर होऊन पदोन्नतीची शक्यता सुद्धा वाढीस लागेल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष