शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कन्या राशिभविष्य 2021 : कराल मार्गक्रमण प्रगतीपथावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 15:13 IST

Virgo Horoscope 2021: आपणास नशिबाची साथ मिळाल्याने अनेक कार्यात आपण यशस्वी होऊन सुखी जीवनाचा परमोच्च बिंदू गाठण्याकडे वाटचाल कराल.

२०२१ हे वर्ष कन्या राशीच्या जातकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारे आहे. ह्या वर्षी आपण निव्वळ आपली स्वप्ने साकार करणार नसून आपल्या जीवन मुल्याना समजून घेऊन यशस्वी व्यक्ती होण्यासाठी अग्रक्रम द्याल. आपल्या प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजात आपणास सन्मानित केले जाईल. कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंद पसरेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या सर्व कार्यात यशस्वी होऊ शकाल. ह्या वर्षी विनाकारण एखाद्याशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. २०२१ दरम्यान कन्या राशीच्या जातकांना एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा पवित्र नदीकाठी स्नानाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपणास शांतता व मानसिक ताणापासून मुक्ती मिळेल. ह्या वर्षात आपले आरोग्य सामान्यतः उत्तम राहणार असल्याने आपल्या विविध योजना आपण निर्धारित वेळेत पूर्ण करू शकाल. आपली पत वाढून प्राप्तीत वाढ होताना सुद्धा दिसून येईल. ह्या वर्षी नोकरी करणाऱ्यांना अनेक नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. हे वर्ष व्यापारी वर्गासाठी खूपच चांगले आहे. नात्यातील गोडवा वाढेल. आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जागरूक राहून परिश्रम करावे लागतील. आपल्या उद्दिष्टांप्रती एकनिष्ठ राहून आपणास कार्यरत व्हावे लागेल. आपण जीवनाप्रती व्यावहारिक दृष्टिकोन बाळगून असता. हे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल व परिस्थितीचे आकलन करूनच आपणास आचरण करावे लागेल. २०२१ दरम्यान कन्या राशीचे जातक प्रगतीपथावर मार्गक्रमण करतील. हे वर्ष आपल्या संततीसाठी विशेष अनुकूल दिसत नसल्याने आपणास त्यांची प्रकृती व संगत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा आपल्या काळजीत वाढ संभवते. शैक्षणिक क्षेत्रात आपणास नवीन काही करून दाखविण्याची संधी मिळू शकते. आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून हाती आलेली संधी निसटून जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने अनेक कार्यात आपण यशस्वी होऊन सुखी जीवनाचा परमोच्च बिंदू गाठण्याकडे वाटचाल कराल. आपली प्रगती कोणाच्या आड येणार नाही ह्याची काळजी घ्यावी, अन्यथा त्यांच्या कडून आपणास त्रास दिला जाईल. आपल्या माता - पित्यांची प्रकृती उत्तम राहणार असल्याने आपण त्यांच्या बद्दल निश्चिन्त राहू शकाल.

वैवाहिक जीवन (Virgo,Love and relationship Horoscope 2021)

२०२१ चे वर्ष कन्या राशीच्या जातकांसाठी प्रेम, संबंध व वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून आंशिक यश मिळवून देणारे आहे. ह्या वर्षी आपणास आपल्या वैवाहिक जीवनात एकनिष्ठता दाखवावी लागेल. प्रियव्यक्ती खेरीज इतर कोणतीही दुसरी व्यक्ती आपल्या जीवनात नसल्याचे आपण सिद्ध करून दाखवू शकलात तरच आपले वैवाहिक जीवन टिकू शकेल. आपण दोघे मिळून काही दान सुद्धा कराल. आपले संबंध दृढ होतील. अधून मधून विशेषतः वर्षाच्या मध्यास काही आव्हाने समोर येतील. एखादी व्यक्ती हस्तक्षेप करून आपल्या संबंधात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या शक्यतेमुळे अशा व्यक्तीपासून सावध राहावे. एकंदरीत हे वर्ष चांगले आहे. विवाहितांना २०२१ चे वर्ष अत्यंत आशास्पद आहे. आपल्या जोडीदाराशी जवळीक साधण्याच्या अनेक संधी आपणास प्राप्त होऊन आपल्यातील तणाव दूर होतील व आपल्या संबंधातील माधुर्य वाढेल. 

१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा! 

आर्थिक (Virgo,Finance Horoscope 2021)

आर्थिक बाबतीत वर्षाची सुरवात सामान्यच राहिली तरी सुरवातीच्या काही महिन्यात अनपेक्षित पद्धतीने धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. काही विशिष्ट परिस्थितीत आपल्या पैकी काही लोकांना पैतृक संपत्ती प्राप्त होण्याची सुद्धा शक्यता असून काही लोकांना अवैध कार्यातून सुद्धा धन प्राप्ती होण्याची संभावना आहे. कायद्याविरुद्ध जाऊन धन प्राप्ती झाल्यास भविष्यात आपण अडचणीत येण्याच्या शक्यतेमुळे थोडी काळजी घ्यावी. गुप्त धन प्राप्ती संभवते. गरजेनुसार आपणास धन प्राप्त झाल्याने आपल्या कोणत्याही कार्यात अडथळा निर्माण होणार नाही. २०२१ दरम्यान आपला निधी नियंत्रित ठेवण्यासाठी कन्या राशीच्या जातकांनी आपल्या पैशांची गुंतवणूक एखाद्या स्थावर मालमत्तेत किंवा चांगला परतावा मिळू शकेल अशा एखाद्या ठिकाणी केल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल. हे वर्ष आपले आर्थिक जीवन उंचावण्यासाठी धन प्राप्ती करून देणारे आहे.

नोकरी, व्यवसाय, करिअर (Virgo,Job-Career-Business Horoscope 2021)

नोकरी करणाऱ्या जातकांसाठी वर्षाची सुरवात काहीशी संथ गतीने होईल व कदाचित त्यांना वर्तमान नोकरीत बदल करण्याच्या प्रयत्नात यश मिळवून देईल. दुसरी नोकरी त्यांना त्वरित मिळाली तरी त्यात त्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. आपणास प्राप्ती सुद्धा चांगली होईल. वर्षभर आपणास सकारात्मक बातम्या मिळतील, तेव्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून परिश्रम करावेत. विशेषतः फेब्रुवारी, मे - जून व सप्टेंबर ते ऑक्टोबर ह्या दरम्यान नोकरीत चढ - उतार येतील. कन्या राशीच्या व्यापारी जातकांना हे वर्ष आर्थिक समृद्धी देणारे असल्याने त्यांनी विशेष काळजी करू नये. आपल्या अनेक योजना कार्यान्वित होऊन आपणास धन प्राप्ती करून देतील व त्यामुळे आपली सर्व कार्ये नियोजित वेळेनुसार होऊ शकतील. २०२१ च्या मध्यास आपल्या व्यापारास प्रगती पथावर नेण्याच्या अनेक संधी सुद्धा प्राप्त होतील, त्यांचा सदुपयोग करावा. वर्षाचे अखेरचे महिने सुद्धा चांगले असणार आहेत.

शिक्षण (Virgo,Education Horoscope 2021)

२०२१ चे वर्ष कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मिश्र फलदायी आहे. समाजास नवीन दिशा देऊ शकेल अशा विषयांची गोडी आपणास लागेल. आपण कोणत्याही विद्या शाखेचे विद्यार्थी असलात तरी काही नवीन विषयांची गोडी आपणास लागेल, ज्यात सामाजिक परोपकाराचे कार्य, नैतिक शिक्षण व प्राचीन विद्येशी संबंधित विज्ञान ह्यांचे अध्ययन करण्यास आपले प्राधान्य असेल. अधून - मधून आपले लक्ष विचलित होण्याच्या शक्यतेमुळे शिक्षणात अडथळे आले तरी आपले शिक्षण असे कितीही चढ-उतार येऊन सुद्धा चालू राहून पूर्णत्वास जाईल. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांनी २०२१ दरम्यान उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केल्यास त्यात घवघवीत यश मिळवून आपल्या आनंदात भर घालू शकतील. ज्यांना विदेशी विश्व विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्यांना त्यासाठी आपले प्रयत्न वाढवावे लागतील.

आरोग्य  (Virgo,Health Horoscope 2021)

आरोग्याच्या दृष्टिकोनातून कन्या राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष सामान्यतः चांगले आहे. वर्षाच्या सुरवातीचा महिना काहीसा दुर्बल जरूर आहे. ह्या दरम्यान आपणास एखादी दुखापत, अपघात, दुर्घटना किंवा शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने वाहन चालवताना काळजी घ्यावी. ह्या व्यतिरिक्त वर्षाचे मार्च, मे व सप्टेंबर हे महिने आरोग्याच्या दृष्टीने दुर्बल असल्याने ह्या दरम्यान आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. एरव्ही आपले आरोग्य उत्तम राहील. आपल्या आहारावर व दिनचर्येवर लक्ष दिल्यास ह्या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडून आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकाल. आपले शरीर सुद्धा एक मंदिरच आहे हे लक्षात ठेवावे.

टॅग्स :horoscope 2021राशिभविष्य २०२१